बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला.
तर गावामध्ये आनेक ठीक ठिकाणी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिना निमित्त वृक्ष लागवड करीत आसताना गटविकास अधिकारी सचिन खुडे बोलत आसताना म्हणाले की,, पिंपरी बुद्रुक गावामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आसताना प्रत्येक ग्रामस्थांनी स्वतःच्या घरा शेजारी आथवा शेतामध्ये, किंवा मोकळ्या जागेत किमान 10 तरी झाडे लाऊन जोपासावी, त्यामुळे पर्यावरणा मध्ये उष्णतेचे प्रमाण होणार नाही. म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा हाच शासनाचा उपक्रम आसुन झाडे लावून जगवणे हीच आज काळाची गरज आहे. तसेच बायो गॅसचा देखील लाभ ग्रामस्थांनी घ्यावा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे उद्गार..
पिंपरी बुद्रुक गाव भेटी दरम्यान गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी नविन घरकुलची पहाणी, बायोगास व सार्वजनिक शौचालयाचीही पाहणी करण्यात आली. चालू वर्षी नवीन वृक्ष लागवड करण्याचे आवाहनही यवेळी ग्रामस्थांना करण्यात आले.
पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नामदेव बोडके यांच्या हस्ते गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. तसेच,तंटामुक्ती अध्यक्ष आनंता बोडके यांच्या परिवाराच्या वतीनेही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, विस्तार अधिकारी इनुस शेख, विस्तार अधिकारी अजित घोगरे, राजेंद्र काळे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, आनंता बोडके, नामदेव बोडके, वर्धमान बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, सोमनाथ बोडके, राजेंद्र बोडके, जब्बार शेख, संजय सुतार, चक्रधर सूर्यवंशी, आण्णासो पाटील, युवराज गायकवाड, शशिकांत सुतार, शंकर रनदिवे, भाऊ रनदिवे, भाऊ सूर्यवंशी, सोमनाथ चौगुले, बादल पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.