पोहार पोटफोड़ी नदी संवाद यात्रेस गोडलवाही पासून शुभारंभ..

 

डॉ.जगदिश वेन्नम

       संपादक 

गडचिरोली, दि.१५ : चला जाणूया नदीला या उपक्रमातील पोहार पोटफोड़ी नदी संवाद यात्रेला धानोरा तालुक्यातील गोडलवाही (हिप्पानेर) पासून उगम झालेल्या गोडलवाही (हिप्पानेर) या गावापासून शुभारंभ झाला. 

       या संवाद यात्रेचा संजय वल्के नायब तहसीलदार धानोरा यांच्या हस्ते व वन परिक्षेत्र अधिकारी नितिन हेमके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत गोडलवाहीचे सरपंच नरेश तोफा होते.कार्यक्रमाचे आयोजन नदी समन्वयक व गावकरी यांच्या मदतीने करण्यात आले होते.त्यात प्रामुख्याने ग्राम सभा अध्यक्ष व उपसरपंच दिनेश उसेंडी, महसूल मंडल अधिकारी पी एम चहारे,महसूल मंडल अधिकारी विलाश मुप्पीडवार, पाठबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता कमलेश अखाड़े, ग्राम सचिव श्री मोहुर्ले, तलाठी एन एच मेश्राम, ए के ढवले, आर आर कुथे,सामाजिक कार्यकर्ता श्री एम डी चलाख, पोहार/पोटफोड़ी नदी समन्वयक नदी प्रहरी प्रकाश आर अर्जुनवार, विविध ग्रामपंचायती प्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग व इतर विभाग यांचा प्रामुख्याने सहभाग लाभला.

     कार्यक्रमावेळी श्री वल्के सरपंच,श्री तोफा व श्री हेमके यांनी,”चला जाणूया नदीला,या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित गावकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच या संवाद यात्रे बाबत नियोजन सांगितले. नदी समन्वयक ‌श्री अर्जुनवार यांनी प्रस्तावनेत पोहार पोटफोड़ी नदीबद्दल माहिती दिली व संवाद यात्रेची रूपरेषा सांगितली. 

उद्घाटन कार्यक्रमानंतर जल कलश यात्रा काढून नदी जल पुजन करून दिंडी काढण्यात आली.गोडलवाही हिप्पानार गावात पदयात्रेचे आयोजन करून उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. 

       या संवाद यात्रेमधे दि.20 जून पर्यंत सिवनी पर्यंत विविध गावांमधे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कार्यक्रमावेळी संचालन सुनील गोंगले आणि आभार अरूण जाबर यांनी मानले .