‘त्या’ आरोपींना कठोर शिक्षा द्या…! — भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी:- अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करा,अशी मागणी अहेरी येथील महिलांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षकांच्या मार्फतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

      निवेदनात म्हटले आहे की, 10 जून रोजी दहावी उत्तीर्ण मुलगी बाहेर गावावरून शालेय कामानिमित्त आलापल्ली येथे आले असता,निहाल कुंभारे व रोशन गोडशेलवार या युवकांनी त्या अल्पवयीन आदिवासी मुलीला दारू पाजून अतिप्रसंग केला.आलापल्ली येथे घडलेली ही घटना घाणेरडी,घृणास्पद व चीड आणणारी असून सदर प्रकरण अत्यंत गंभीर व निंदनीय असा आहे. तात्काळ या प्रकरणाचा निर्वाळा लावून आरोपी निहाल कुंभारे आणि रोशन गोडशेलवार यांना कठोर अशी फाशीची शिक्षा द्या.एवढेच नव्हेतर,या घटनेत आणखी कोणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्यास सखोल चौकशी करून त्यांच्यावरही योग्य कारवाई करा अशी मागणी महिलांनी केली आहे.

       निवेदन देताना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,शाहीन हकीम,सारिका गडपल्लीवार,लक्ष्मी बाई कुळमेथे,शोभा मडावी,सुवर्णा पुसालवार,प्रिया तोर्रेम, निवेदिता विरगोनवार,खुशी डोंगरे,आचल घुगल,ताजु कुळमेथे,अमित मुजुमदार, बाबुराव तोर्रेम,तिरुपती मडावी आदी उपस्थित होते.