गारअकोले येथे रंगला भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा,तर 1350 हुन अधिक कुस्ती मल्ल पैलवानांची आखाड्यामध्ये उपस्थिती…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           गारअकोले तालुका माढा येथे निकाली कुस्त्याचे भव्य आणि दिव्य मैदान भरविण्यात आले.100 रुपयापासून ते 51 हजार रुपये इनामा पर्यंतच्या नामांकित निकाली कुस्त्या लावण्यात आल्या.एक नंबरच्या कुस्तीमध्ये रामा कांबळे पुणे काका पवार वस्तादचा पट्टा याला चितपट करून,, वस्ताद आण्णा साहेब गायकवाडचा पट्टा पैलवान महेश बिचकुले यांनी बाजी मारुन विजय मिळवला. चांदीची गदा देऊन पैलवान महेश बिचकुले त्यांचा आखाड्यामध्ये हलग्यांच्या आवाजात सन्मान करण्यात आला.

           गारअकुले बजरंग आखाड्याचे नामांकित वस्ताद आण्णासाहेब गायकवाड व माजी सरपंच जितेंद्र गायकवाड, पैलवान आमोल गायकवाड व मित्रपरिवार हे कुस्ती मैदानाचे आयोजक आसून यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली सालाबाद प्रमाणे निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात येत असते.राजे छत्रपती संभाजी महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बजरंग आखाडा कारअकोले यांच्या प्रांगणात निकाली कुस्त्या घेण्यात आल्या.महाराष्ट्रातून अनेक नामांकित कुस्ती मल्ल पैलवान यांची उपस्थिती होती या आखाड्यामध्ये 650 निकाली कुस्त्या लावण्यात आल्या तर 1350 हुन अधिक कुस्ती मल्ल पैलवान यांनी आपली उपस्थिती दर्शवली. गेली नऊ वर्षापासून सातत्याने कुस्ती मैदान चालूच आहे.

          गारअकोले येथील बजरंग कुस्ती आखाड्यामध्ये कुस्त्या जोडण्याचे काम व नियोजन महाराष्ट्र केसरी, मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर आपा, पैलवान आण्णासाहेब गायकवाड कुस्ती निवेदक युवराज केचे, माजी सरपंच जितेंद्र गायकवाड पैलवान आमोल गायकवाड यांनी काम पाहिले.

        आखाड्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माढा तालुक्याचे भावी आमदार रंणजीत भैया शिंदे, अजित तोरस्कर , उद्योजक सुरज भैय्या देशमुख ,नानासाहेब देशमुख , रावसाहेब मगर , आमर भैया जगदाळे , गणेश पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते तर पंच म्हणून बापूसाहेब कोकाटे हिम्मतभाऊ सोलंकर, संतोष दोरवड , , राजेंद्र राजमाने ,काकासाहेब जगदाळे , सुनील बोडके , सर्जेराव चौरे ,नवनाथ वाळेकर ,यांनी काम पाहिले.

            कुस्ती आखाड्यामध्ये आलेले मान्यवर व नामांकित पैलवान यांचा देखील यावेळी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कुस्ती मैदानाचे संपूर्ण निवेदक म्हणून पैंलवान युवराज केचे यांनी काम पाहिले.