मुरूमगांव येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…

भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

          उमंग शिक्षण व सामाजिक आदिवासी बहुदेशीय विकास सेवा संस्था,रिडवाही यांचे सौजन्याने आयोजित विविध शासकीय विभागातिल योजनांचा जनसामान्यांना लाभ मीळवन्याकरीता मार्गदर्शन केंद्र मुरूमगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

        या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारोह प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मनोहर पाटिल पोरेटी माजी उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थिति दर्शवली शिवप्रसाद गवारणा होते.

        यावेळी उदघाटन प्रसंगी मनोहर पाटील पोरेटी यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवप्रसाद गर्वना सरपंच ग्रां.पं.मुरूमगांव यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

         यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून हरिरामजी धुर्वे अध्यक्ष उमंग शिक्षण व सामाजिक आदिवासी बहुदेशीय विकास सेवा संस्था रिडवाही, अजमनजी रावटे बंसोड साहेब वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगांव,मुनीर शेख सदस्य ग्रां.पं.मुरूमगांव, शिवनाथसिंग टेकाम ,वसंत कोलिमारा पो.पा.मुरूमगांव उसेंडी मेजर पो.म.केंद्र मुरूमगांव, कडमकर मेजर पो.म.केंद्र मुरूमगांव,मनोज तुलावी, बेदराम कोराम,अभीजित मेश्राम ,सिजनसींग भक्ता प्रकाश हलामी, मदनजी बढ़ाई रोषन कोवाडकर उपस्थित होते.

        मान्यवरांनी संस्था ही गरीब आणि गरजू निरक्षर जनतेचे आधारकार्ड,रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजना असे अनेक योजनेचे काम या संस्थेमार्फत केले जात आहे.याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हरिराम धुरवे यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे संचालन व आभार ओम देशमुख यांनी मानले.