विचारवंतांची कमी नाही….. — पण आचारवंतांचे “बी ” सुद्धा नसलेला भारत देश..

        “21व्या शतकातला भारत देश जगाच्या तंत्रज्ञान प्रगतीच्या प्रवाहात निश्चितपणे सर्वात पुढे जाईल कदाचित. परंतू , विसाव्या शतकातील तत्वज्ञानी महापुरुषांच्या संस्कृतीला जगाच्या वेशिवर टांगतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

               कारण या देशातील धार्मिक विचारांची बुरसटलेली जुनी पिढी सोडा, परंतू , जी युवा पिढी ( 25 ते 45) शिकून कंपन्यात, बँकेत, खाजगी क्षेत्रात, किंबहुना सरकारी क्षेत्रात सुद्धा चांगल्या किंवा बऱ्या पगारावर नोकऱ्या करून आपल्या आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा भागवतात ( अर्थात कर्जे काढुनच) आणि एकंदरीत त्यांच्या मानसिक परिघात सुखी जीवन जगतात.

                    या युवा पिढीला मात्र आमच्या देशाच्या इतिहास, येथील व्यवस्था, येथील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वातावरणाशी काहीही घेणेदेणे नसणारी ही युवा पिढी. जी सदसदविवेक बुद्धी हरवून बसलेली, वैचारिक भूमिका नसलेली, स्वार्थाशिवाय डोकं न चालवणारी. ही युवा पिढी उद्याचा देश घडवीणारी……….!

 आमचा देश कुठल्या दिशेने प्रवास करतो आहे?

  याचे कारण काय असू शकेल?

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून वयाच्या 6 ते 14 वर्षे बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची जी सुविधा दिली, त्याचे मुख्य कारण हेच होते,की या वयोगटातील बालकाचा मेंदू कोरा असतो. त्याच्या या कोऱ्या मेंदूत जे कू किंवा सू संस्कार जे भराल ते त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकाऊ असतात ( वैज्ञानिकदृष्ट्या आणि मानववंशदृष्ट्या ) म्हणून ही सुविधा संविधानातून केलेली आहे.

         आणि तसे शैक्षणिक धोरण सुद्धा आवश्यक आहे. ज्यामध्ये त्या बालकाची सदसदविवेक बुद्धी म्हणजेच विवेक शक्ती ही विज्ञानावर आधारित तत्वज्ञानाने विकसित झाली पाहिजे ( धार्मिक कर्मकांड किंवा अंधश्रद्धा यावर आधारीत नव्हे ).

            अशी शिक्षण पद्धती आम्ही गेल्या 75 वर्षात येथील सरकारने कधी स्वीकारली नाही, केवळ पोपटपंची करून आमचे शिक्षक,प्राध्यापक या देशाचा इतिहास व इतर सामाजिक शास्त्रे पास किंवा मार्क्स मिळविण्यापुरते शिकवतात, तसेच या देशाची प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, उद्देशीका केवळ पोपटपंची करूनच सांगितल्या जाते. कधी त्याचा अर्थ, त्याच्या निर्मितीचा इतिहास कधी विद्यार्थ्यांच्या सदसदविवेक बुद्धीपर्यंत शिक्षक पोहचवत नाहीत. म्हणून उद्याचा देश घडवीणारी युवा पिढी आज 21 व्या शतकात वैचारिकदृष्ट्या,मानसिकदृष्ट्या सैरभैर झालेली आहे.

        केवळ येथील व्यवस्था व सरकार,येथील माध्यमे जे चित्र निर्माण करतात तसे अनुकरण करून जीवन जगणे हेच आपले कर्तव्य समजून, व्यसनाना बळी पडून, स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला कायमचे मारून टाकून जीवन व्यतीत करणारी ही ” युवा पिढी………….. “

          जिच्यामध्ये विचारवंतांची कमी नाही पण आचारवंतांचं “बी ” सुद्धा नाही. हे काही एका रात्रीत घडले नाही,याला कारणीभूतही आमची जुनी व आताची जेष्ठ सुशिक्षित पिढी सुद्धा कारणीभूत आहे. विसाव्या शतकातील देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या ( 25 वर्षापर्यंतच्या ) तत्कालीन युवापिढीचा सुसंस्कृतीचा आचारिक आदर्श नंतर येणाऱ्या पिढीने कायम टिकवून ठेवला असता………

     तर ही अशी युवा पिढी घडलीच नसती..!”

     पण तरी सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही……..

           आजच्या 2024 च्या काळातील याच युवापिढीने सर्वप्रकारच्या संकटावर मात करून आपल्या स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला कायमचे अविष्कारीत करून जात, धर्म, पंथ यांना जगाच्या वेशीवर टांगून……..

        मानवता धर्मालाच अविष्कारीत कसरण्यासाठी “भारताच्या संविधानाला,राष्ट्रीय धर्मग्रंथ समजून स्वतःची,परिवाराची,समाजाची, देशाची,विश्वाची एकंदरीत संपूर्ण सजीव सृष्टीची प्रगती साधावी….

        अन्यथा याच युवा पिढीने व्यसनाधीन राहून कधीही ” माणूस ” न बनता येथील व्यवस्थेचे गुलाम म्हणूनच जीवन जगावे आणि एक दिवस भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून घ्यावी…….!!!

                 आवाहनकर्ता

                 अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर 7875452689 ..

                (जागृतीसाठी अग्रलेख)