दिक्षा कऱ्हाडे
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत नगरपरिषद,नगरपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिंकणे हा मुख्य उद्देश असून,हा उद्देश यशस्वी करण्यासाठी मासळ-खडसंगी जी.प.क्षेत्रातंर्गत काॅंग्रेस पक्ष बांधणीच्या कामाला गावखेड्यातून सुरुवात केली असल्याने,याच पक्ष बांधणीच्या कार्यातंर्गत पक्ष मजबूतीसाठी अहोरात्र श्रम घ्यायला तयार असल्याचे ठाम मत,”काॅंग्रेस पक्षाचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी आधार निवास येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खुलासेवार सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांत काॅंग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला असला तरी “तो पराभवच,चिमूर विधानसभेचा विजय असेल असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
चिमूर – नागभिड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकातंर्गत झालेली अभद्र युती व युतीच्या माध्यमातून झालेला त्यांचा विजय हा पक्षासाठी मारक ठरणार नाही याची काळजी आम्ही घेतली असून अशा अभद्र युती पासून व ज्यांनी अभद्र युती केली त्यांच्या पासून काॅंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सावध राहणे आवश्यक असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांबरोबर पक्ष हिताचे कार्य करतांना जिद्दीला व निष्ठेला विराम राहात नसल्यामुळे लोकहिताचे सदोदित कार्य करण्यासाठी सर्व मार्गे खुली असतात व सदर मार्गेच पुढील भविष्य अधोरेखित करतात असेही युवा नेते दिवाकर निकुरे यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत दिवाकर निकुरे यांच्यासह गजानन बुटके,गौतम पाटील,जावा भाई व इतर पदाधिकारी कार्यकर्तागण उपस्थित होते.