दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
जिद्दीला व चिकाटीला पुर्ण विराम नसतो आणि ध्येयनिष्ठतेला सिमा नसतय,याचा प्रत्यय प्रबोधनात्मक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागपूर येथील शंभू नगरात आलाय.
विश्वविख्यात प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या १३३ व्या जयंती दिनानिमित्त नागपूर येथील शंभू नगरातील नागरिकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचारित्र्यावर आधारित १४ एप्रिल ला भिम गित गायनाच्या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात प्रख्यात समाजसेविका आणि एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनीष सवाई-भगत यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचारित्र्यावर आधारित विविध गित गाऊन उपस्थितांना रिझविले व याच गित गायनाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रबोधन केले.
“बुध्दाकडे वळू लागले…या गितांसह अनेक महत्त्वपूर्ण गित गाऊन समाजसेवीका आ.मध्यमा मनीष सवाई-भगत यांनी अमुल्य समाजसेवा केली असल्याचे मतमतांतरे उपस्थितांनी व बौद्ध बांधवांनी व्यक्त केले.