धानोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

बौद्ध समाज धानोरा यांच्या वतीने डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू मशाखेत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम ढवळे अभय इंदूरकर सोपानदेव मशाखेत्री प्रकाश बौध्द महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी ताई मशाखेत्री नगरसेविका सौं अलकाताई मशाखेत्री नगरसेविका सीमा थूल या मंचावर उपस्थित होते.

 

        बौध्द समाजाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरुषोत्तम ढवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. बौद्ध समाजाचे अध्यक्ष बंडू मशाखेत्री यांच्या हस्ते निळा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्ध समाजाचे अध्यक्ष बंडू मशाखेत्री पुरुषोत्तम ढवळे अभय इंदुरकर नगरसेविका सौं अलकाताई मशाखेत्री नगरसेविका सीमा थूल या प्रामुख्याने उपस्थित होते.

          कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीत गायनाने सुरुवात करण्यात आली.

         मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकले. बाबासाहेबांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरित होते. बाबासाहेब एकटे दलितांचे नेते नसून संपूर्ण भारताचे संपूर्ण विश्वाचे नेते आहेत असे सांगण्यात आले.

          कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मयूर मशाखेत्री यांनी केले कार्यक्रमाला बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.