भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
आज 14एप्रिल ला एकता व्यापारी संघटना चातगाव व ग्राम वासिया तर्फे संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष राजुभाऊ शेणमारे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.योगिराज कराडे व डॉ. चांगदेव शेंडे हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून करण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे योजिराज काराडे चांगदेव शेंडे यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुभाऊ शेनामारे राजुभाऊ जीवनी माजि जिल्हा परीषद सदस्य शामरावजी उईके, विनायक सोरते, राजु ठाकरे, मुकुंदा दरडे, जयेंद्र गायकवाड, लोमेस रोहनकर ,रवी गुरनुले व इतर सदस्य उपस्थित होते. या जयंती निमित्त विद्यार्थी ना पेन व नोटबुक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.