
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटने तर्फे जागतिक महिला दिन व गोरगरीब महिलांच्या सन्मान सत्कार कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह साकोली येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा येथील समाज कल्याण सभापती सभापती शितल राऊत होते तर उद्घाटक पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण होते.
प्रमुख अतिथी म्हणून महामाया बहुउद्देशी सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी सामाजिक कार्यकर्त्या इंद्रायणी कापगते,महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे,महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने, महासचिव वंदना लोणे, सामाजिक कार्यकर्ता कविता मडामे, गोंदिया जिल्ह्यातील अध्यक्ष कविता ऊके, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर स्वागत गीत झालं आणि स्वागत गीता नंतर ज्या महिलांचा संघर्ष जीवनामध्ये सुरू आहे. ज्या महिला संसारामध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत अतोनात प्रयत्न करतात संघर्ष करतात अशा गोरगरीब महिलांच्या सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये ईदू सूर्यवंशी ,प्रमिला शेंडे ,गोपिका वालदे,रजनी वलथरे यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटनेला वाढवण्याकरता व महिलांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करतात त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या इंद्रायणी कापगते, शीतल नागदेवे, मीनाक्षी वाहने यांच्या सुद्धा चळवळी वाढवण्याचा दृष्टिकोनातून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर समाज कल्याण सभापती शितल राऊत यांनी सांगितलेले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जो हिंदू कोड बिलामुळे आपला समान वाटा आणि समान संधी व महत्त्वाचे महिलांचे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या अधिकार चां फायद्यात करून जीवनामध्ये आपण संघर्ष करतच आहात समर्थ समोर सुद्धा करणार आहात.
परंतु आपण जीवनामध्ये मुलांबाळांकडे कुटुंबाकडे व समाजाकडे व महिलांच्या समस्या कडे आपण लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त समाज कल्याण सभापती शितल राऊत यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हाण सर यांनी सुद्धा महिलांचे काय अधिकार आहेत आणि पोलीस स्टेशनला किती मोठ्या प्रमाणात महिलांच्या संबंधित केसेस येतात हे सांगून महिलांवर त्यासाठी महिला संघटना जागृत असले पाहिजे आणि महिलांच्या समस्या उठाव केला पाहिजे असे मत पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्याचप्रमाणे महामाया संघटनेच्या संस्थापक डी जी रंगारी यांनी सुद्धा महिला समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सामाजिक न्याय संघटनेला तक्रार करून आम्ही आपल्या तक्रारीचे निवारण करून समिती महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले.
त्याचप्रमाणे मीनाक्षी वाहने, शितल नागदेवे, इंद्रायणी कापगते , कविता ऊके, सुवर्णा हुंमने या सर्वांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रम के संचालन आचल तागडे व आभार मृणाली कोल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डी जी रंगारी, शितल नागदेवे, मीनाक्षी वाहने, सुषमा वाघमारे, वंदना लोणे, कविता मडामे, सुनंदा राऊत लता नंदेश्वर, प्रमिला टेंभुर्कर, प्रतिमा राऊत, पौर्णिमा खांडेकर, प्रभादेवीं अंबादे,पल्लवी, मंजू कुंडलवार शुभांगी रामटेके, वर्षा बोरकर,शितल गेडाम तृप्ती वासनिक ,रिता मेश्राम, कविता बोरकर ,असे 100 महिला याप्रसंगी उपस्थित होता.
या ठिकाणी भंडारा,गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, या ठिकाणी बहुतांचे महत्वाचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.सभागृह भर गच्च भरलेला होता हे विशेष.