दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील माजी सैनिक व शौर्य चक्र पदकाचे मानकरी स्व.गोविंदराव पानसरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे चिरंजीव उद्योजक प्रकाश पानसरे आणि कुटुंबानी व इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या सहकार्याने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांच्या सानिध्याने पावन झालेल्या सिध्दबेटात वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व यातून होणाऱ्या बदलाचा मानवी जीवनावरील विपरीत परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, याच उद्देशाने माजी सैनिक स्व.गोविंदाराव पानसरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे प्रकाश पानसरे यांनी सांगितले.
यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, मी सेवेकरी फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, ॲड.विलास काटे, लेखक राजेश दिवटे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनील वाघमारे, जनार्दन पितळे, अरुण बडगुजर, विठ्ठल शिंदे, तुकाराम माने, शिरीषकुमार कारेकर, ज्ञानेश्वर महाराज तावरे, दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, बाळासाहेब पानसरे तसेच पानसरे परीवार व वारकरी साधक बहुसंख्येने उपस्थित होते.