ग्रीनफ्रेंड्स तर्फे सावरी ग्रीन पार्क व लाखनी येथील तलावावर “बर्ड व बटरफ्लाय” निरीक्षण… — लाखनी निसर्गमहोत्सव ,वर्ल्ड वेटलँड डे तसेच ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटिंग निमित्ताने पक्षीनिरक्षण आयोजन… — ताजुश शरिया कोचिंग सेंटरचे सहकार्य…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

लाखनी :- येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे दरवर्षी वर्षातून तीनवेळा पावसाळी,हिवाळी व उन्हाळी स्थानिक पक्षिनिरीक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांना घेऊन करण्यात येते.यावर्षी सुद्धा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे लाखनी निसर्ग महोत्सवाच्या निमित्ताने तसेच वर्ल्ड वेटलँड डे तसेच ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटिंग कार्यक्रमाचे औचित्य साधून सावरी येथील ग्रीन पार्क तलावावर व लाखनी तलावावर “बर्ड व बटरफ्लाय” निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

        या कार्यक्रमास ताजुश शरिया कोचिंग सेंटर, अ.भा. अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा लाखनी जिल्हा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.

         या पक्षिनिरीक्षणात एकूण 22 प्रकारचे पक्षी तर 10 प्रकारचे फुलपाखरे विद्यार्थ्यांना आढळले.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगर पंचायत पर्यावरण ब्रँड ॲम्बेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी सर्व विद्यार्थ्यांना पक्षी व फुलपाखरे ओळख करून दिली. त्यात त्यांनी नर मादी,त्यांचे वैशिष्ट्ये तसेच रंग रूप आकार यांचा परिचय करून दिला.सावरी ग्रीन पार्क तलाव येथे असलेले सुंदर पक्षीजीवन बघून विद्यार्थी प्रसन्न झाले तर लाखनी तलावावर असलेल्या इकार्निया वनस्पतीचा विळखा बघून कमी झालेली पक्षी संख्या बघून विद्यार्थी चिंताग्रस्त झाले.

         पक्षिनिरीक्षण व फूलपाखरू निरीक्षण कार्यक्रमास ताजुश शरिया कोचिंग सेंटरचे संचालिका मिनाज मोटलानी तसेच विद्यार्थी यथार्थ कावळे, शंतनु कावळे,अधिराज जाधव,दक्ष कोहळी, सोमांश क्षीरसागर, सुक्रीति रामटेके,ग्लोरी मेश्राम, ख्वाइश टहिल्यांनी,राशी ठवरे, भार्गवी लांजेवार, स्निती भिवगडे, इकरा आकबानी, मिताली गायधनी, जान्हवी निर्वाण, अन्विक्षा थोटे, याशी वंजारी, आसीया आकबानी, आराध्या खेडीकर, भुविष्का थोटे, तेजस्विनी राजगिऱ्हे यांनी सहभाग नोंदविला.त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

          कार्यक्रमास ग्रीनफ्रेंडस पदाधिकारी अशोक वैद्य,अशोक नंदेश्वर, नगरसेवक संदीप भांडारकर सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ.मनोज आगलावे, अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर, देशमुख डाइग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ .प्रमोद देशमुख,नाना वाघाये, डॉ.छगन राखडे, डॉ .योगेश गिऱ्हेपुंजे, कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी,सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोपाल बोरकर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,रमेश गभणे, भैय्याजी बावनकुळे,दिलीप निर्वाण,योगराज डोर्लीकर,सरपंच सचिन बागडे, लाखनी नगरपंचायत शहर समन्वयिका लीना कळंबे ,दिलीप निर्वाण,निर्वाण इलेक्ट्रिकल्सचे भूपेंद्र निर्वाण, महाराष्ट्र प्लास्टिक सेंटरचे अनिल बावनकुळे इत्यादींनी सहकार्य केले.