
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- उपवनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली वनविभाग गडचिरोली अंतर्गत गोंडवाना हर्ब्स प्रकल्प येथे दिनांक १५, १६ व १७ फेब्रुवारी २०२५ ला कॅम्प आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने औषधी वनस्पती मंजुर एम.एस. पी. दूराने खरेदी करण्यात येत आहे.
करीता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील ग्रामसभा, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत जनतेने खालील आवश्यक वनौषधी व्यवस्थितरित्या संकलन करुन उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांचे परिसरातील गोंडवाना हर्ब्स प्रकल्पामध्ये सदर तारखेला उपस्थित राहावे.
विक्री पोटीची रक्कम आर. टी.जी.एस. व्दारे अदा करण्यात येईल. त्याकरीता सोबत बैंक पासबुक व छायांकित प्रत आणावे.
वनौषधींची यादी सोबत जोडण्यात येत आहे.
तसेच खरेदी करावयाच्या वनस्पतीची पडताळणी गोंडवाना हर्ब्सच्या तज्ञाकडुन करण्यात येईल व योग्य माल खरेदी करुन अनुचित माल घेतल्या जाणार नाही. मालाच्या गुणवत्तेनुसार एमप एस.पी. दराने माल खरेदी करण्यात येईल. त्यासंबंधी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाच्या तज्ञांचा निर्णय अंतिम असेल. असे वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.