सिंदेवाही व ब्रम्हपुरी येथील रेल्वे मार्गावरील उडाण पुलाच्या बांधकामास प्रारंभ… — आ.विजय वडेट्टीवार यांची वचनपूर्ती – अफवा पसरवविनाऱ्या विरोधकांची बोलती बंद…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        एखादी काम हाती घेतल की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्त न बसणारे व दिला शब्द समर्थपणे पुर्ण करणे अशी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे.

           याचाच प्रत्यय नुकताच सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यांतील नागरीकांना आला असुन आपल्या अथक प्रयत्नातून आ.वडेट्टीवार यांनी मंजुर केलेल्या सिंदेवाही – पाथरी तसेच ब्रम्हपुरी – आरमोरी रेल्वे मार्गावरील उडाण पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरविणाऱ्या विरोधकांची प्रचंड गोची होऊन बोलती बंद झाल्याची दिसून येते.

          आपल्या घराण्याला कुठलाही मोठा राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर बड्या प्रस्थापितांना धक्का देऊन विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्याची जन्मभूमी तर गडचिरोली जिल्हा ही कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत विजय वडेट्टीवार नावरूपाने एक कणखर कर्तुत्ववान नेतृत्व उदयास आल.

           एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री व विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारून जनतेने दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सार्थक ठरवीत प्रगल्भ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वी चिमुर तर आता ब्रह्मपुरी मतदार संघाचा झपाट्याने विकास केला.

          शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, शिक्षणार्थी विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच इतर जनसामान्य यांच्या प्रश्नांना घेऊन शासन दरबारी समर्थपणे लढा देऊन वेळीच निकाली काढणे अशी आमदार विजय वडेट्टीवार यांची ख्याती आहे. त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेतेपदी असताना विरोधी बाकावरून आपल्या क्षेत्रासाठी हिरीरीने समस्या मांडून सिंदेवाही ते पाथरी तसेच ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील रेल्वे फाटकावर वाहतूकदारांना तसेच शाळकरी विद्यार्थी व इतर जनसामान्यांना होत असलेला त्रास बघून प्रयत्नांची पराकाष्टा केली.

            याचे फलित म्हणून सिंदेवाही – पाथरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (९० कोटी) व ब्रम्हपुरी ते आरमोरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (७५ कोटी) इतका भरघोस निधी मिळवून दिला. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काळात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

            अशातच विरोधकांनी मतदार जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध अफवा पसरवून रेल्वे उडान पूल होणार नसल्याचे सांगत मतदारांना भ्रमिष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला. मात्र दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आ .विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली सदर दोन्ही कामे प्रारंभ झाली असून नागरिकांमध्ये आनंद तर विरोधकांची बोलती बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

          तत्पूर्वी सिंदेवाही – मूल मार्गावरील बेलघाटा व मूल ते चंद्रपूर मार्गावर प्रचंड वाहतूक असतानाही तद्वतच येथे उडानपुलांची नितांत गरज असतानाही येथील लोकप्रतिनिधी नागरिकांची तसेच वाहतूकदारांची समस्या सोडविण्यात आजवर असमर्थ ठरले आहे. मात्र माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिक व वाहतूकदारांना होणारा नाहक त्रास या समस्याचे स्वबळावर निराकरण करण्यात यश प्राप्त केले आहे.

            निर्माणधीन सदर दोन्ही पुलाचे काम पूर्ण होताच सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांच्या वेळेचा होणारा अपव्यय व वाहतुकीचा होणारा खोळंबा याला पूर्णविराम मिळणार असून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र विकासाचे आणखी एक पाऊल पुढे टाकणार असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.