संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत
— परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत चौथे प्रशिक्षणाचे औचित्य.
सेंद्रिय शेती केल्याने जमिनीचे आयुष्य वाढते.शेतमालांना योग्य भाव मिळते व आपली जमीन सुपीक होते.सेंद्रिय शेतीमध्ये मित्र कीटकांचे संगोपन कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते.सेंद्रिय शेतीमध्ये मधमाशांचे खूप मोठे योगदान आहे.
फळ,फुल सेटिंगच्या अवस्थेत मधमाशी पिकांत परागीकरण करून माल दुप्पट तयार करण्याचे काम करतात.शेतात पीक घेतांनी पूर्व नियोजन महत्त्वाचे आहे असे ते मार्गदर्शन करताना म्हणाले.
श्री.अजयजी राऊत भंडारा येथील आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री.अजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व श्री यादवराव मेश्राम कृषी भूषण शेतकरी,श्री.अनिल किरणापूरे प.स.सदस्य व युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत चौथे प्रशिक्षण लवारी येथे पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.शिवाजी भारती बायोडीनामिक तज्ञ अकोला यांनी काढणी पश्चात तंत्रज्ञान,सेंद्रिय साठवणुक पद्धती,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेंद्रिय मानके,यावर सखोल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे कृषी विकास प्रशिक्षणाचे अध्यक्ष श्री.अजय राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेती करणे किती महत्त्वाची आहे याबाबत सखोल माहिती दिली.तसेच कंपनीचे उद्दिष्टे,भागभांडवल,प्रमाणीकरण, यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.अनिल कीरणापुरे यांनी सेंद्रिय शेतीतील त्यांचे अनुभव व शेतीतील त्यांचे नवीन प्रयोग mulching वर धान लागवड व मधुमाशा पालन याबाबत माहिती दिली.
कृषी भूषण शेतकरी श्री. मेश्राम यांनी त्यांचे शेतातील नाविन प्रयोग,भाजीपाला पिकांत टरबूज लागवड,सेंद्रिय उत्पादन द्वारे ह्या वर्षाचे आर्थिक लाभ याबाबत माहिती दिली.
( Company) कंपनीचे संचालक श्री.विनोद शिवणकर यांनी सेंद्रिय शेतीतील त्यांचे उत्पादन व वाढलेले उत्पन्न याची माहिती दिली.शेतकऱ्यांनी खरेदी केलेले tricoderma, स9, ऊर्जा याबाबत कु.रजनीगंधा टेंभूरकर यांनी माहिती दिली.
सदर कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या समस्या वर चर्चा करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरीक्षक साक्षी कापगते,शैलेंद्र वाढाई,नरेंद्र भांडारकर,श्री.केशव लांजेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.