डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक 

 

    गडचिरोली,(जिमाका)दि.15:शासननिर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियत 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी, जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 06 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन 15 दिवस जाहिर करण्याचे निर्देश आहेत. 

 पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे पत्रानुसार चालु वर्षात पुढीलप्रमाणे दिवस निश्चित करुन सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी सकाळी 06.00 वा. ते रात्रो 12.00 वा.पावेतो निर्धारीत करुन आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 1 दिवस (दिनांक 19.02.2023), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती- 1 दिवस (दिनांक 14.04.2023), 01 मे, महाराष्ट्र दिन – 1 दिवस, गणपती उत्सव – 3 दिवस (दुसरा, सातवा व अनंत चतुर्थदशी), ईद ए मिलाद- 1 दिवस (दिनांक 28.09.2023), नवरात्री उत्सव – 2 दिवस (अष्टमी, नवमी), विजयादशमी- 1 दिवस (दिनांक 24.10.2023), दिवाळी- 1 दिवस (लक्ष्मीपूजन दिनांक 12.11.2023), ख्रिसमस – 1 दिवस (दिनांक 25.12.2023), 31 डिसेंबर – 1 दिवस (दिनांक 31.12.2023).

 जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली सन 2023 या वर्षामध्ये वरीलप्रमाणे 13 दिवस ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून या आदेशाद्वारे घोषित करीत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरण यांचे तंतोतंत पालन करावे. जनहित याचिका क्र.173/2010 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यात यावे. उपरोक्त अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्या. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. कोविड-19 चे अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमावली अधीन अटी व शर्ती लागू राहतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

****

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com