सतिश कडार्ला
प्रतिनिधी
आज दि.13/02/2023 रोजी उपपोस्टे झिंगानुर च्या वतीने मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल . साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता,यतिश देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून व मा.सुहास शिंदे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्याचे उद्घाटन म्हणून श्रीराम डोबा मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून झिंगानुर उपसरपंच शेखर गणरपु, सिरीया मडावी तर अध्यक्ष स्थान प्रभारी अधिकारी पोउपनि देविदास झुंगे उपपोस्टे झिंगानुर यांनी भुषविले.
प्रास्ताविक दरम्यान PSI उदय पाटील यांनी आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड यांचे महत्व उपस्थित जनसमुदायास सांगितले, जनतेनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा पोलीस विभाग आपल्या सेवेसाठी सदैव तयार असतो आपण अतिदुर्गम भागात असुन प्रत्यक्ष योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे आणि तो मिळुन देण्याकरीता पोलीस विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी अधिकारी देविदास झुंगे साहेब यांनी सांगितले.
सदर मेळावा दरम्यान आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड कॅम्प चे आयोजन करण्यात येवून 24 आयुष्मान कार्ड आणि 07 आभा कार्ड काढून देण्यात आले.तसेच अपंग प्रमाणपत्र, बस सवलत कार्ड, विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आवश्यक व गरजू लोकांना साडी,धोतर चे वाटप करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांना जेवनाची व्यवस्था करण्यात आली.
मेळाव्यास पोस्टे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक मासा आत्राम,कारे बक्का मडावी रा. लोहा,मारा आत्राम, महेश मडावी , पोलीस पाटील लच्छा गावडे, तसेच पोउपनि कोळी, पोउपनि मंडल, पोउपनि कस्तुरवार तसेच लोहा,येडसिली,मंगीगुडम,
वडदेली, कल्लेड,झिंगानुर येथील 250 ते 300 नागरिक उपस्थित होते.