दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
युगप्रवर्तक जगद्गुरु तुकाराम महाराज ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवन भूमीतून ग्रंथ दिंडीचे व जागर यात्रेचे आगमन गडचिरोलीत झालेले असून,या ग्रंथा दिंडीचे स्वागत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जलोषात स्वागत केले.
या ग्रंथदिंडीचे नेतृत्व धनराज पाटील काकडे अमरावती यांनी केलेलेअसून, शेतकरी, शेतमजूर यांना जीवनावश्यक वस्तू कायदा,वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा, कमाल shet जमीन धारणा सिलिंग कायदा. जमीन अधिकरण कायदा,अश्या अनेक कायदेशीर बाबीवर चर्चासत्र करण्यात आले. या चर्चा सत्रात डॉक्टर शिवनाथ कुंभारे, अरविंद वासेकर, अरुण मुंघाटे पंडित पुडके,गुरुदेव भोपये, रोहिदास राऊत,पांडुरंग घोटेकर, राजू जक्कवार, हंसराज उंदीरवाडे,अशोक खोब्रागडे, अरुण नेताम, सालोटकर व भाष्कर नरुले व शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी या चर्चा सत्र त भाग घेतला.