तन मन समर्पित करून राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे धोरण जनसामान्यपर्यंत पोहचवा… — तालुका संघटनात्मक बैठकीत जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांचे आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तनमन समर्पित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले…

          राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी तालुकाच्या वतीने स्थानिक विश्रामगृहात आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी संघटनात्मक बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जि.प.कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा कार्याध्यक्ष रुषाली भोयर, सोशिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष दीपक बैस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

         राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून व दीप प्रज्वलीत करून संघटनात्मक बैठकीची सुरुवात करण्यात आली.

         जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर हे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदच्या निवडणुकीच्या संबंधाने राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे कार्य व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवून तन मन समर्पित करून आतापासून कामाला लागावे. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषदसभापती, नानाभाऊ नाकाडे, अमीन लालानी, रुशाली भोयर यांनी सुद्धा बैठकीला मार्गदर्शन केले.

         यावेळी बैठकीला तालुका सरचिटणीस अनिल अलबनकर, तालुका सचिव उदाराम दिघोरे, शहर सरचिटणीस राकेश बेहरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल राचमालवार, शहर सचिव प्रशांत मोगरे, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, महिला तालुका अध्यक्षा संगीता मेश्राम, महिला शहर अध्यक्षा जयश्री भोयर, युवक तालुका उपाध्यक्ष, श्रीधर पोटेकर, मधुकर खापरे, राजु आकरे, सुरेंद्र बावनकर, सुनील ढोरे, गणेश मंगरे, योगाजी थोराक, रवी दुमाने, सुधाकर अनोले, अतुल मेश्राम, वासाळाच्या उपसरपंच उज्वला मंगरे,भाग्यश्री मेश्राम, डिम्पल बांबोळे, ललिता भोयर, गीता सपाटे, वैशाली चिलबुले, सीता घाटूरकर, अस्मिता खोब्रागडे, नीलिमा मेश्राम,मंजुषा हूड, संगीता दुमाने, उर्मिला हर्षे, रीना नेवारे, इंदिरा हूड आणि आरमोरी शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

         जिजाऊ जयंती महोत्सवाच्या निमित्य आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बैठकी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय पिंपळकर, गुरुदेव मेश्राम, दिवाकर शास्त्रकार, संदीप सपाटे, रविंद्र सपाटे, फिरोज भोयर, महेश वरखडे, घनशाम मेश्राम, धनंजय दुमाने, मनीषा कानतोडे, शोभा नेवारे, रंजना चिलबुले, पूजा शेरकुरे, सीमा दुमाने, संगीता दुमाने, शीतल भांडेकर, रजनी निंबेकर, जयश्री चन्ने, सुरेखा मेश्राम, जयश्री भोयर, कुसुम मेश्राम, रसिका मेश्राम, सुगंधा मेश्राम, अल्का भोयर, करिष्मा निखारे, मिना मेश्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.  

           यावेळी बैठकीचे संचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस अनिल अल्बनकार, शहर सरचिटणीस राकेश बेहरे यांनी केले.