
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (संभाजी नगर) चा 14 जानेवारीला नामविस्तार करण्यात आला होता. त्या निमित्त दर्यापूर येथिल अशोकनगर येथील अशोका बुद्धविहार येथे नामविस्तार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब उमाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक ॲड. संतोष कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गावंडे, सुधिर बसवंत,दिपक लालाजी गवई, इंदुबाई गवई, अंबिकाताई कोल्हे हे उपस्थित होते.
नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेल्या व तत्कालीन लढ्यात तुरुंगवास भोगलेल्या अशोकनगर येथिल प्रल्हादराव गावंडे, वेणूताई गावंडे, वत्सलाबाई बसवंत, अरुण गवई, भाऊरावजी गवई यांचा विशाखा महिला मंडळ व नागरिक हक्क संरक्षण समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश गावंडे, सिंधुबाई गवई, इंदुबाई गवई ॲड.संतोष कोल्हे यांनी नामविस्तार लढ्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शेकडो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता गवई यांनी तर प्रास्ताविक सुधीर बसवंत यांनी तसेच आभारप्रदर्शन सविताताई गावंडे यांनी पार पाडले.