ज्ञानज्योत स्कूल मध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमास प्रारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : शाळा मराठी मिडीयम असो अथवा इंग्रजी मिडीयम प्रत्येक शाळेचा एकच ध्यास मुलांना चांगले संस्कार देणे, एक आदर्श नागरिक बनविणे. याच उद्दात हेतूने आळंदीत ग्यानज्योत इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमास प्रारंभ झाला.

           या प्रसंगी सुभाष महाराज गेटे, नरहरी महाराज चौधरी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानज्योत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, नरहरी महाराज सांगळे, वासुदेव महाराज शेवाळे, श्रीधर घुंडरे, विलास वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर पाटील, सुभाष दाभाडे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण, चंद्रकांत गोरे, मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, विजय धादवड, कैलास आव्हाळे, अर्जून मेदनकर आदी उपस्थित होते.

            श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने २० ज्ञानेश्वरी पारायण प्रत, २ सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रशालेस सुपूर्द करण्यात आले. यावेळेस मनोगतातून अजित वडगावकर, प्रकाश काळे, नरहरी चौधरी, नरहरी सांगळे यांनी या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना, पालकांना, शाळेला कसा होतो हे उदाहरणास समजावून सांगितले.

          अध्यक्ष भाषणात सुभाष महाराज गेठे यांनी ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाची ज्योत खऱ्या अर्थाने प्रज्वलित झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे सांगितले.