राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
स्थानिक तहसील कार्यालय येथे नुकतेच रुजू झालेले नवनियुक्त तहसिलदार ओमकार पवार यांनी सफर तहसिल कुरखेडा हा उपक्रम शैक्षणिक विद्यार्थि व विद्यार्थीनी करिता सुरू केला आहे.या उपक्रम अंतर्गत विद्यार्थी यांना महसूल प्रशासन विभाग व्यवस्थे ची ओळख व माहिती व्हावी हा मुळ उद्देश ठेवून खरमतटोला येथील जानकीबाई ब.चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालयच्या प्रा.कु.उमा चंदेल यांचे मार्गदर्शनात तहसिल कार्यालय कुरखेडा येथे भेट दिली.
या उपक्रमाचि माहिती व तहसिल कार्यालय अंतर्गत येनारया महसूल विभागाच्या योजनांची माहिती नायब तहसीलदार धनबाते,बोके मैडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थी यानी मानव विकास अंतर्गत शिरपूर पर्यंत बस दिवाळी पासून येत नसल्याचे सांगितले असता त्वरीत बस स्थानक प्रमुख याना बस सुरू करन्याच्या सुचना देल्या. या प्रसंगी प्रा.फुलबांधे,प्रा.सुखदेवे सह कर्मचारी उपस्थित होते.