प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी:- नेहमी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या युवारंग लोकहीत संघटना, आरमोरी तर्फे पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिला भाविकांसाठी वैनगंगा नदीच्या पात्रात कपडे बद्दलविण्यासाठी तंबुची व्यवस्था दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा करण्यात आली व जागोजागी कचरापेटी ची व्यवस्था करून कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी युवारंग लोकहीत संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राहुल जुआरे स्वंय रक्तदाता गडचिरोली जिल्ह्या समिती चे अध्यक्ष चारुदत्त राऊत ,युवारंग लोकहीत संघटनेचे उपाध्यक्ष मनोज गेडाम प्रचारक आशुतोष गिरडकर ,संयोजक पंकज इंदूरकर , रोहित बावनकर युवारंग चे सदस्य विशाल चौके ,पंढरी जुआरे, सुमित खेडकर, लीलाधर मेश्राम,श्रीराम ठाकरे ,नलेश खेडकर,महेंद्र मने उपस्थित होते.