दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी आळंदी शहरातील प्रितम ज्ञानेश्वर किर्वे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर यांच्या सूचनेनुसार खेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.
भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुकाध्यक्ष शांताराम गायकवाड यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव यांनी प्रितम किर्वे यांची निवड केली.
प्रितम किर्वे यांनी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून यापुर्वी काम पाहिले आहे. तसेच अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव योगदान दिले असल्यामुळे व सामाजिक प्रश्नांची जाण विचारात ही निवड करण्यात आली आहे.
यावेळी आळंदी शहर भाजपाचे अध्यक्ष किरण येळवंडे, उपाध्यक्ष संकेत वाघमारे, चारुदत्त प्रसादे, ज्ञानेश्वर बनसोडे, सचिन सोळंकर, सुजीत काशीद, गणेश थोरवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.