‘अयोध्येच्या मंदिरात मूर्तीऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीची शाळा सुरू करणे बाबत…’ — सावित्रीच्या लेकीची प्रधानमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती — माननीय प्रधानमंत्री,     नवी दिल्ली,भारत सरकार

 

विषय : अयोध्येच्या मंदिरात मूर्ती ऐवजी ज्ञानाचा प्रकाश देण्प्रया सावित्रीची शाळा सुरू करणे बाबत…

             सन्माननीय प्रधानमंत्री साहेब, आपणास देशातील ९५ टक्के जनतेच्यावतीने नम्र विनंती करते की, आपला भारत देश संविधानावर चालणारा देश असून, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपल्या भारताला जगात मानाचे स्थान आहे. परंतु आपण देशाच्या सांविधानिक पदावर असताना देखील, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या म्हणजेच मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या दबावास बळी पडून त्यांच्या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या धार्मिक अजेंड्याखाली, भारतीय जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून, मानसिक विकलांग करत, विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम बनवित आहात. खरेतर बहुजनांचा नेता देशाचे नेतृत्व करत असताना, खऱ्या अर्थाने मंदिरातील मूर्ती, बहुजन समाजाला वैचारिक विकासात्मक दृष्टी देईल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. यावर विचार व्हायला हवा. अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून, देशाला अज्ञानाच्या अंधकारात टाकण्याऐवजी, त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीमाईची शाळा सुरू करावी.

             ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीची शाळा सुरू करून, शिक्षण, बेरोजगारांना रोजगार, सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देऊन, देशाचे आरोग्य व प्रगतीकडे लक्ष दिल्यास, आपला भारत देश थोड्याच दिवसात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही! याची पूर्ण खात्री देते. कोणाच्या श्रध्दा व भावना महत्वाच्या नसून, सत्य-वास्तविक, विज्ञानवाद समाजाने स्विकारला तरच आपला भारत पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो. संत कबीरांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, ‘पाहन पूजे हरि मिले, तो मैं पूजू पहाड़।’ कबीरांच्या या ओळी माहीत नाहीत का ? म्हणून येत्या २२ जानेवारीला अयोध्येच्या मंदिरात मूर्तीऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीची शाळा सुरू केल्यास, जग भारताला संत महापुरुषांचा विज्ञानवादी आदर्श भारत म्हणून आदराने पाहिल. व त्याचे सर्व श्रेय भारताच्या प्रधानमंत्री यांना असेल. कृपया अयोध्येच्या मंदिरात मूर्ती ऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीमाईंची शाळा सुरू करावी, ही नम्र विनंती.

**

धन्यवाद,जय भारत.

👇👇

देशाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून मानसिक विकलांग करत गुलाम बनवणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात या पत्राचा जास्तीत जास्त वापर करून जनजागृती करावी.

                 आपली नम्र

          प्रिया वंदना शुभाष नुप्ते