अबोदनागो चव्हाण
तालुका प्रतिनिधी
चिखलदरा
अमरावती जिल्हा अंतर्गत मोझरी येथील डॉ.रगुनाथ भाऊराव वाडेकर यांच्या घरी ७ जानेवारी रोजी चोरी झाली होती.त्या अनुषंगाने अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अप्पर पोलिस अधीक्षक सशिकांत सातव यांनी तिवसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार व गुन्हे शाखा यांना लेखी आदेश देऊन चोरांना जेरबंद करण्याचे सुचित केले होते.
पोलिस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार तिवसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेतील पथकांनी चोरांच्या दिशेने वेगाने चक्र फिरविले आणि नागपूर जिल्हा अंतर्गत तथा बुटेबोरी जवळील मौजा खैरी येथील आरोपी श्री.विक्की नथ्थू सोलंकी व मौजा सातगाव येथील श्री.गोपाल दुजेराम दिवांगण यांना खात्रीच्या माहिती नुसार अटक केली.
दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी डॉ.रगूनाथ वाडेकर यांच्या घरी चोरी केली असल्याचे कबूल केले.
चोरी दरम्यान वापरण्यात आलेले हुडाई आय २०-एफ.पी.२१११ या नंबरचे चार चाकी वाहन,५ मोबाईल,व इतर साहित्य जप्त केले.साहित्याची किंमत ३ लाख ६२ हजार १५० आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तालीम शे.गफुर,श्रीपिओ उपनिरीक्षक मुलचंद भांबुकर,पो.हवा.पुरुषोत्तम यादव,उमेश वाकपंजार,मंगेश लडके,सचिन मसांगे,चालक सचिन नेहारे व सायबर सेलचे रितेश वानखेडे यांनी चोरांना अटक करण्याची यशस्वी जबाबदारी पार पाडली.
वर्धा,भंडारा व छतिसगड राज्यांतर्गत दुर्ग जिल्ह्यातील घरफोड्यांसी व चोरींसी सदर आरोपींचा संबंध आहे काय?या दिशेने तपास सुरू झाला आहे.
तिवसा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.