आळंदीत स्वप्नसाकार हेल्थ केअरच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…. — संगणकीय ॲटोमॅटीक जर्मन स्कॅनींग पद्धतीने आरोग्य तपासणी…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

        आळंदी : येथील स्वप्नसाकार हेल्थ केअर यांच्या माध्यमातून तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि.७) व बुधवार (दि.८) नोव्हेंबर रोजी मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन इंद्रायणी सेवा फौंडेशनचे उपाध्यक्ष शिरिषकुमार कारेकर यांचे हस्ते करण्यात आले. सदर शिबिरामध्ये आळंदी आणि परीसरातील ३०० हून अधिक लोकांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन शिबीराचा लाभ घेतला. 

          या शिबिरामध्ये डॉ.एस.बी.देवकर, डॉ.राजश्री बिराजदार, डॉ.सुनिल वाघमारे, डॉ.भुषण माळी यांनी उपस्थितांना विविध प्रकारच्या आजाराविषयी मार्गदर्शन करून त्यांची तपासणी केली. तसेच यावेळी पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, विठ्ठल शिंदे, जनार्दन पितळे, कोमल शिंदे, अरुण बडगुजर, राजेश दिवटे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

           यावेळी डॉ. सुनील वाघमारे यांनी सांगितले की सदर शिबिरात सर्व शरीराची संगणकीय ॲटोमॅटीक जर्मन स्कॅनींग पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. एक व्यक्ती एक शरीर ३५ पेक्षा जास्त टेस्ट अशा प्रकारे पूर्ण शरीराची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन, निदान व उपचार करण्यात आले