रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम 

 

राजाराम:- विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे आहे. खेळामुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. एवढेच नव्हे तर, विविध क्रीडा स्पर्धामुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.अर्जुना क्रिकेट क्लब,नागेपल्ली द्वारा आयोजित भव्य खुले टेनिस बॉल 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलते.यावेळी या क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनुवार,प्रमुख पाहुणे माझी कार्यकर्ते कांचनलाल वासनिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, कार्यकर्ते प्रकाश चुनारकर, सामाजिक कार्यकर्ते सारंग सवरंगपते, पोलीस पाटील गणपत गुरनुले, किशोर धकाते, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई सिडाम,स्मिता निमसरकार गीता दुर्गे, किरण कुमार खोब्रागडे आणि नगेपल्ली येथील समस्त क्रिकेट प्रेमी तथा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या भागात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जातात.ही चांगली गोष्ट आहे.मात्र,केवळ मुलांचे क्रीडा स्पर्धा आयोजन केले जातात.अश्याचे प्रकारे मुलींचे स्पर्धा झाल्यास मुलींनाही विविध ठिकाणी आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल आणि आपल्या भागातील मुलीही पुढे जातील.आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जात आहेत,शहरातील मुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुली चांगले खेळतात.त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.अश्याच प्रकारे मुलींसाठीही स्पर्धेचे आयोजन करा त्यासाठी आवश्यक मदत करण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

नगेपल्ली येथील गण्यारपवर यांच्या भव्य पटांगणावर 14 जानेवारी पासून स्पर्धेला सुरुवात झाली.सदर स्पर्धेसाठी आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम आणि शाहीन हकीम यांच्याकडून द्वितीय आणि ग्रा प सदस्य मलरेड्डी येमनुरवार यांच्याकडून तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे.यासोबतच वैयक्तिक आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने चमुनीं सहभाग घेतला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com