सावली तालुका छायाचित्रकार संघटनेतर्फे वार्षिक सर्व साधारण सभा व सत्कार समारंभ…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        सावली तालुका छायाचित्रकार संघटनेतर्फे आसोलामेंढा येथे नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

        सावली तालुका छायाचित्रकार संघटनेतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सावली शहरातील स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा पुष्पगुच्छ, शील्ड व भेटवस्तू देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

         आपले मनोगत व्यक्त करताना प्रशांत तावाडे यांनी स्वच्छ भारत अभियान सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.

        शासनाच्या या उपक्रमात नागरि स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या परीने स्वच्छतेचे काम करीत आहेत. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने थोडा वेळ स्वच्छतेसाठी दिल्यास ग्राम सुधारण्यासाठी हातभार लागेल असे म्हणाले.

        यावेळी अहवाल वाचन संघटनेचे सचिव प्रवीण द्विवेदी यांनी केले.

        यावेळी सावली तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद बांगरे, ज्येष्ठ छायाचित्रकार विजय गोगले, उपाध्यक्ष आकाशकांत सहारे, कोषाध्यक्ष राहुल भरडकर सुजित भसारकर, राजेंद्र नागोसे,विनोद भोयर,नितीन कांबळे, मोहन कोरडे,राज निकुरे,मोरेश्वर फुलझले, गोपाल कलमलवार, रवीकृष्णा खरवडे, संदीप वंजारी यांची उपस्थिती होती.

         सूत्रसंचालन मुकुंदा गवारे, तर प्रस्ताविक सुधीर म्हशाखेत्री व आभार विवेक बांबोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचा सहकार्य केले.