दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
शुभम गजभिये
तालुका प्रतिनिधी चिमूर…
उमरखेड शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत संपूर्ण देशभरात प्रथम क्रमांकावर असलेल्या यवतमाळ जिल्हयातील शेतकर्याच्या कोरडवाहु असलेल्या शेतजमीणी सिंचनाखाली येउण येथील शेतकर्यांचे जिवनमान उंचवावे म्हणुन शासन मोठा खटाटोप करीत कालव्यांची रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलबध्दता करुण देत आहे परंतु उपलबद्ध निधीतुन बेसुमार व दर्जाहीन पद्धतीचे कामे करुण शासण स्तरावरून उपलबद्ध निधीवर ताव मारल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.
इसापुर धरणाचे पाणी उमरखेड तालुक्यातील शेतजमीणीला जास्तीत जास्त प्रमाणात मीळावे व कोरडवाहु असलेल्या शेतजमीणी सींचनाखाली याव्यात म्हणुन इसापुर धरणातुन डाव्या कालव्याची निर्मीती करण्यात आली इसापुर धरणा पासुन तब्बल ८४ कि.मी.चा हा मुख्य कालवा असुण या कालव्याला जोडुण असलेल्या वितरीका व मायनर ची निर्मीती उर्ध्व पैनगंगा विभागामार्फत करण्यात आली असुन आउटलेट ते टेल पर्यन्त पाणी पोहचवीण्याचे शासण धोरण असल्यामुळे शासणा कडूण उमरखेड तालुक्यातील बहुतांश वितरीका व मायनरच्या कामाचे मुरुम अस्तरी करण व सिमेंट लाईनींगची कामे मोठ्या धडाक्यात करण्यात येत आहेत या सर्व कामासाठी शासणाच्या पाटबंधारे विभागामार्फत करोडो रुपयांचा निधी देखील उपलबद्द करुण देण्यात आला आहे परंतु उपलबद्ध शासण निधीतुन दर्जाहीन,निकृष्ठ व बेसुमार पद्धतीची कामे करण्यात येत असल्याने काम सुरु असतानाच लाईनींगला जागो जागी मोठमोठे तडे गेल्या चा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ हदगाव या कार्यालया मार्फत उमरखेड तालुक्यातील राजापुर वाडी व मार्लेगाव मायनरच्या लाईनींगचे काम ( सिमेंट काँक्रीटीकरण ) चे काम सुरु असुण अद्याप काम पूर्ण झाले नसले तरीही करण्यात आलेल्या तब्बल १ते दिड किलो मीटर लाईनींगच्या कामाला आतापासुनच ठिकठीकाणी तडे जाऊ लागल्यामुळे शासण स्तरावरून उपलबद्ध झालेला कोट्यावधीचा निधी वाया जात असल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चीन्ह निर्माण झाले आहे
कोरडवाहु शेतजमीणी सिंचनाखाली आणुन येथील शेतकर्यांचे जिवनमान उंचावीण्याच्या प्रयत्नात असलेल्या शासण उदेशालाच कंत्राटदार व अभियंत्या कडूण हरताळ फासवील्या जात असल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त केल्या जातअसुण शासणाचे नियम व निकष बासनात गुंडाळून ही कामे करण्यात येत असल्याने तालुक्यातील शेत सिंचनाचा प्रश्न पुन्हा एरनीवर असला तरीही या बाबीचे सोयर सुतक मात्र उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकार्याना व सबंधीत कंत्राटदाराला मात्र राहीले नसल्याचे वास्तव पुढे येत असुन मोठ्या प्रमाणात थातुर मातुर व निकृष्ठ पणे करण्यात आलेल्या या कामाची गुणनियंत्रन विभागाच्या उच्च स्तरीय समीती मार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे…
*****
चौकट…
इसापुर धरनाच्या डाव्या कालव्याची सुरु असलेली कोट्यावधी रुपयांची कामे ही मराठवाडयातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ अंतर्गत करण्यात येत असुण प्रत्यक्षात ही सर्व कामे विदर्भात करण्यात येत असली तरीही यावर देखरेख मात्र मराठवाड्यातुन केल्या जात असल्यामुळे कोणताही अधीकारी येथील कामांकडे लक्षच देत नसल्याची ओरड शेतकरी वर्गातुन केली जात आहे.
तालुक्यात कोट्यावधी रुपयांची कामे सुरु असली तरीही प्रशासनातील यंत्रनेचे याकडे लक्षच नसल्यामुळे कंत्राटदार व संबधीत कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्याचे मात्र चांगलेच फावत असुण या गंभीर बाबीकडे नवनियुक्त आमदार किसनराव वानखेडे याणी विशेष लक्ष देउन हा प्रश्न सभागृहात उपस्थीत करण्याची मागणी केल्या जात आहे.
****
चौकट …
कोट्यावधी रुपयांचा खर्च या कामावर केल्या जात असला तरीही करण्यात आलेल्या कामामुळे टाकळी मायनर नंबर दोनचे व विडुळ मायनर नंबर एक चे सिंचनच बंद झाले असल्याची माहीती पुढे आली असुन लेवल प्रमाणे कामे न केल्यामुळे सिंचनच बंद झाले असुण ज्या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्ची घालुन ही कामे केल्या जात आहेत त्या उदेशाचे भान मात्र संबंधीत कंत्राटदार व अभियंत्याला राहीले नसल्याचे यावरून अधोरेखीत होत आहे.