सुमारे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीच्या आर्याच्या अतिक्रमणाची पुनरावृत्ती संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अर्थात 2025 मध्ये.
सर्व बहुजनहो आणि संविधाननिष्ठ, देशभक्तहो, विज्ञानवादी, विवेकवादी म्हणजेच मानवतावादी आणि विशेष म्हणजे आपापल्या कट्टर आंधळ्या धर्मापेक्षा निसर्गाला आणि मानवता धर्माला मानणाऱ्या मूलनिवासी आणि पूर्वीच्या शूद्र, अती शुद्रानो, काळाच्या ओघात वाहत जाणाऱ्यानो, जय संविधान………..
ज्याप्रमाणे आपल्या देशात या कुटनीतीच्या पहिल्या निसर्गवादाविरुद्ध असलेल्या प्रतीक्रांतीला शह देण्याचे काम तथागत भगवान बुध्दांनी केले. अगदी तसेच प्रयत्न ग्रीकमध्ये त्यांच्या महपरिनिर्वाणानंतर अवघ्या 10 वर्षांनी जन्मलेल्या…….
सॉक्रेटीसने ( तत्वज्ञानाचा जनक ) यांनी केले.
एक महापुरुष क्रांतिकारक राजमहाल सोडून अणवानी पायी वनामध्ये भटकंती करुन निसर्गाच्या सानिध्यातून चिंतन, मनन करून शारीरिक व मानसिक त्याग, संघर्ष समर्पनातून जगाची दुःखमुक्तीचे तत्वज्ञान निर्माण करुन जगाला सुखी जीवनाची दिशा देतात………
तर दुसरीकडे त्यांच्याच जीवनाचा आदर्श घेऊन अठराविश्व् दारिद्र्य जन्मताच घेऊन शेवटपर्यंत त्यातच राहून ग्रीकमधील आर्याच्या कुटनीतिविरुद्ध म्हणजेच सोफेस्टिकटेड नितिविरुद्ध बंड करुन आपल्याच दशातील 700 वर्षांपूर्वीच्या लोकशाही मूल्यांना पुनर्जीवीत करण्यासाठी युवापिढीला जागृत करण्याचे काम सॉक्रेटीस करतात.
त्या काळात संसदच न्यायालयीन भूमिका पार पाडत असे. तर 501 संसद खासदारासमोर त्याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होतात. जे गुन्हे खोटे असतात. परंतू , 501 खासदारासमोर एकटा सॉक्रेटीस (जो कधीही शाळेत न गेलेला संत गाडगेबाबा प्रमाणे, आपल्या विनाभिंतीच्या विद्यापीठात लोकशाही मूल्यांचा अनुभवाच्या विद्वत्तेतून डॉक्टरांचा डॉक्टर असलेला ) सर्व गुन्ह्यातून स्वतःला निर्दोष सिद्ध करतो. साक्षीदारांना त्यांच्यासमोरच उघडे पाडतो.
परंतू , केवळ तू आमच्या देवतेचा अपमान केलास या एकाच गुन्ह्यासाठी ( जो तो सुद्धा खोटा होता ) त्याला देहदंडाची शिक्षा होते. तेंव्हा त्याला मरण्यापूर्वीची अंतिम ईच्छा विचारल्या जाते. तेंव्हा तो म्हणतो की, मला एक महिना ( 30 दिवस ) माझ्या घरासमोर लोकांना, तरुण / तरुणीना, लोकशाही मूल्यांविषयी जागृत करण्यासाठी कुणीही अडवू अशी ही त्याची शेवटची ईच्छा पुरी करतात. तो दररोज हजारो लोकांना लोकशाहीची मूल्य म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचे महत्व पटवून देतो.
सोफेस्टिकटेड कू संस्कृती विरोधात शेवटच्या 30 दिवसात रान पेटवून संपूर्ण ऍथेन्स म्हणजेच ग्रीकमध्ये बंडाचे निशाण रोवतो. शेवटच्या दिवशी विष (हॅमब्लॉक नावाचे विष जे 24 वनस्पतीना एकत्र मिसळून 24 तास घोटून बनवल्या जाते. ज्यामुळे मरणाऱ्याला मरताना कुठलाही त्रास होत नाही) प्राशन करुन आत्महत्या करतो………
याचा अर्थ स्पष्ट आहे की, भरल्यापोटी कुणी क्रांती करू शकत नाही. या एका नव्या तत्वज्ञानाने जन्म घेतला.*
म्हणून…….
तत्वज्ञानाशिवाय शील नाही, शिलाशिवाय सत्य नाही, सत्यशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय विज्ञान नाही, विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही, प्रगतीशिवाय क्रांती नाही, क्रांतीशिवाय शांती नाही आणि शांतिशिवाय गत्यंतर नाही….
म्हणून तत्वज्ञानाचा जनक असलेले सॉक्रेटीस आणि शांतीचे प्रतिक असलेले भगवान बुद्ध या दोनच महापुरुष आणि क्रांतीकारकांनी प्रथम या भुतलावर आर्याच्या कुटनीतीविरुद्ध भारतात आणि ग्रीकमध्ये दंड थोपटून शह दिला.
म्हणूनच भारतात आणि ग्रीकमध्येच तत्ववेत्यांची खान आहे ते उगीचच नव्हे……
आणि या दोन्ही क्रांतिकारकांच्या नंतर ग्रीकमध्ये अनेक तत्ववेत्यांची निर्मिती झाली. तेथे पुढील काळात लोकशाहीची पुनरस्थापना होण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. परंतु आपल्या देशात मात्र पुष्यमित्र श्यूँगाच्या नंतर साढेतेराशे वर्षे देश लोकशाही मूल्यांपासून वंचित झाला.
अशा काळात……
भिमराव रामजी सकपाळ
यांचा जन्म झाला……
पुढे हेच नाव……
संविधान आणि धम्मचक्र प्रवर्तन क्रांतीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले.
सुमारे साढेतेराशे वर्षे कुटनीतीचा अक्षरंशा हैदोस या देशात होता. जरी परकीय आक्रमणे झालेली असली तरी या कुसंस्कृतीचा बोलबाला कायम होता.
अशा कुटनीतीला कायमचे शह देण्यासाठी केवळ 65 वर्षांच्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्जीवसृष्टीच्या सहाय्याने संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण कसे करता येईल यांचा संपूर्ण विचार केला. तथागत भगवान बुद्ध आणि सॉक्रेटीस यांच्या क्रांतीला पुनर्जिवीत करण्यासाठीच, लोकशाही मूल्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना अविष्कारीत करण्यासाठीच, साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीला जगाच्या वेशिवर टांगण्यासाठीच…….
भारताच्या संविधानाची निर्मिती केली……
जी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे…….
टीप :- या लेखमालेचा उर्वरित शेवटचा भाग उद्याच्या भागात….
या लेखाचे 1/2/3/ 4आणि शेवटचा 5 वा भाग असेल. आपल्या मोबाईलमधील वयक्तिक मो. नं. आणि व्हाट्सप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करावे….
लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689