आरमोरी नगरपरिषद तर्फे शहरात लावलेले वॉटर ए.टी.एम. मशीन बनली शोभेची वस्तु…. — वॉटर ए.टी.एम. मशीन लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना शुद्ध व निर्मळ पाणी उपलब्ध करून द्यावा… — युवारंग लोकहीत संघटनेची मागणी….. 

 

 प्रितम जनबंधु

     संपादक 

आरमोरी :- शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे यासाठी नगर परिषद, आरमोरी तर्फे टिळक चौक मधील दुर्गा मंदिर समोर वॉटर ए.टी.एम. मशीन लावण्यात आली मात्र सदर वॉटर ए.टी.एम. मशीन दीड ते दोन महिन्यापासून शोभेची वस्तू बनलेली आहे. 

 

        त्यातच नगर परिषद आरमोरी तर्फे शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न करता दर १ दिवस आळ पिण्याचे पाणी नागरिकांना मिळते त्यामुळे सदर वॉटर ए.टी.एम. मशीन लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना शुद्ध व निर्मळ पाणी नगर परिषद तर्फे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवारंग लोकहीत संघटना, आरमोरी तर्फे करण्यात आली.

         याप्रसंगी युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, युवारंगचे संघटक रणजित बनकर, आशुतोष गिरडकर, सदस्य चंदाताई राऊत, विभाताई बोबाटे, सुरेश मेश्राम उपस्थित होते.