कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरडा टोल नाक्यावर पोलीस अधिक्षकांच्या देखरेखीखालील विषेश पोलिसांच्या पथकांनी नाकाबंदी करुन अवैद्य वाळुची वाहतुक करणारा (विना राॅयल्टीचा) ट्रक पकडुन दोन आरोपींना ताब्यात घेत ४२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसा कडुन प्राप्त माहिती नुसार गुरवार १४ डिसेंबरला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या देखरेखीखालील विषेश पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली की आमडी फाट्या कडून कन्हान मार्ग नागपुरकडे अवैधरित्या वाळू भरलेला व रायल्टी नसलेला १२ चाकी ट्रक द्वारा वाहतुक करित आहे.
खात्रीशीर माहितीच्या आधारावर पोलीसांनी बोरडा टोल नाक्यावर नाकाबंदी करुन ट्रक क्र. एमएच ४९,बीझेड ९३५७ ला थांबवून पाहणी केली असता,ट्रक मध्ये चालक व क्लीनर आढळुन आले.
पोलीसांनी परिचय देऊन टिप्पर मध्ये काय आहे? असे विचारले तर त्यांनी सांगितले की रेती आहे.पोलीसांनी रेती बाबत राॅयल्टी विचारली असता आरोपींनी नसल्याचे सांगितले.
यावरून पोलीसांनी ट्रक चालक राकेश दशरथ मरस्कोल्हे,क्लींअर मयुर दिनेश पुराम दोन्ही रा.उमरेड यांना ताब्यात घेतले व घटनास्थळावरुन १२ चाकी ट्रक क्र.एमएच ४९,बी झेड ९३५७,किं. ४२ लाख रुपये,१० ब्रास रेती किंमत ३०,०००, दोन अँन्ड्राईड मोबाइल १५,००० असा एकुण ४२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सपोनि अमित पांडे यांच्या तक्रारी वरून आरोपी १) राकेश दशरथ मरस्कोल्हे,२) मयुर दिनेश पुराम व फरार ३) मुरलीधर कडु रा. नागपुर यांच्या विरुद्ध अप.क्र. ७८१/२३ कलम ३७९,१०९,३४ भादंवी सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अन्यवे गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.