रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम:-अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट कोयागुडम येथे जय सेवा क्लब तर्फे भव्य ग्रामीण व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नुकतेच या व्हॅलीबॉल स्पर्धेचे उदघाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सहउदघाटन म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठित नागरिक बुचय्या आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, माजी जि प सभापती इंदरशाह मडावी,माजी प स सदस्य राकेश पन्नेला,उपसरपंच गोपाल वेलादी,बापू वेलादी,गोसाई आत्राम,दिलीप आत्राम,हनुमंतू आलाम,येशूरशाई सडमेक,मलय्या मडावी,प्रदीप मडावी, पार्वताबाई मडावी,मंडळाचे सदस्य तथा व्हॅलीबॉल प्रेमी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी गावात पोहोचताच गावकऱ्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि उपस्थित मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले.
सनी क्रीडांगण दामरंचा (कोयागुडम) येथील व्हॅलीबॉल स्पर्धेसाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक व शिल्ड देण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील जवळपास 30 ते 35 संघांनी सहभाग नोंदविला.उदघाटनीय सामन्यात आमदार आत्राम यांनी स्वतः सर्व्हिस करत व्हॅलीबॉल खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण केले.त्यानंतर उदघाटनीय सामना पार पडला.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.