आशिष धोंगडे
प्रतिनिधी
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१४/१२/२०२२ रोजी शासकीय विश्रामगृह कारंजा येथे जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. डिसेंबर महिन्याचा नियोजन करण्यात आले.नियोजना मध्ये अनुभव शिक्षा केंद्र जिल्हास्तरीय कमिटी उपस्थित होती.बैठकीमध्ये युवकांसोबत खालील विषयावरती चर्चा करण्यात आली.१) अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रियेमध्ये नवीन युवकांना जोडून घेण्याबाबत सर्वानुमते चर्चा करण्यात आली.२) अनुभव शिक्षकेंद्रांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.३)गव्हर्नर सेव्हन सेन्स या प्रशिक्षणासाठी दुसऱ्या कॅम्प संदर्भात प्रशिक्षणा संदर्भात चर्चा करण्यात आली.४) दर रविवारी सुरू असलेल्या *चला जाऊ मैत्रीच्या दुनियेत* या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त युवकांना उपस्थित करण्यासाठी चर्चा झाली.५)अमरावती वाशिम जिल्ह्यामध्ये अनुभव शिक्षा केंद्राचे प्रत्येक युवकां पर्यंत प्रक्रिया पोहोचवण्याबाबत सर्वांना मते चर्चा करण्यात आली.बैठकीचे आयोजन वाशिम येथील जिल्हाध्यक्ष दिव्याताई देशमुख आणि अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा कमिटी यांच्या नियोजनातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. बैठकीमध्ये मार्गदर्शक मा.आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक) आकाश सवाई,भावना सरनाईक,ओमकार शिरसाट,अश्विनी जंवजाळे, विनायक महाले,लखन शिवहरे,ऋषी चौधरी,अभय ठोंबरे या युवकांची उपस्थिती होती.अशाप्रकारे ही बैठक संपन्न झाली..