सावली: (सुधाकर दुधे)

 

सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या व सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे रोजच्याप्रमाणे आपल्या शेताकडे जाण्यासाठी निघाले असता वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून जंगल परिसरात घेऊन गेला.

        वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच गावकरी त्या घटनास्थळावरून त्या दिशेने गेले व पाहणी करू लागले.या घटनेची माहिती वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली ला देण्यात आली.दोन्ही चमू घटनास्थळी उपस्तीत झाले. वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून यावर वनविभाग कसलेही उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत.

 

 

घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे मानेपासून खाल्लेले प्रेतच सापडले.त्यानंतर वनविभागाने पंचनामा करून शव विच्छेदन साठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे.

 

सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com