धानोरा/भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असलेले ग्रामपंचायत मौजा मुरुमगाव येथे आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोज मंगळवार ला प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव ला भेट देऊन परिपूर्ण माहिती घेतली.
1 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान मिशन मलेरिया सुरू असल्याबद्दल साहाय्यक संचालक डॉ.कमलापूरकर मॅडम यांनी परिपूर्ण माहिती घेतली व सविस्तर निरिक्षण करुन कामकाज समाधान कारक आढळले असता पूढील कार्या करीता शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, साहाय्यक संचालक हिवताप डाॅ. निमगडे सर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे सर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोडक सर,व प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थितीत होते