जिल्हाधिकारी कार्यालय येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमीत्त प्रतिज्ञा घेण्याबाबत कार्यक्रम आयोजित…

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. १३ : दिनांक १३.१०.२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमीत्त प्रतिज्ञा घेण्याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

        सदर कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभूर्णे, लेखाधिकारी रमेश मडावी, नायब तहसीलदार संगिता धकाते, वरीष्ठ लिपीक स्वप्निल माटे, जिल्हा नाजर आशिष सोरते, अक्षय भानारकर, विठ्ठल चहांदे, आपदा मित्र रवि कोल्हटकर, कैलाश बंकावार, कुमारी आचल कोकोडे, मंगेश ठाकरे, कुलदीप शिरसाट तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्याबाबत कार्यक्रम संपन्न झाला.

        तसेच जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस साजरा करण्यासंबंधाने तसेच प्रतिज्ञा घेण्याबाबत जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.