राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा…
महाराष्ट्र राज्यातील सर्व महत्वपूर्ण उधोग गुजरातला आणि मध्यप्रदेशला हलवून या राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांना,बेरोजगारांना,कामगारांना,कर्मचारांना हतबल व बेरोजगार केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जुमलेबाजांचे सरदार आहेत.त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास दाखवणे म्हणजे स्वतःचा घात करुन घेणे आहे.म्हणूनच महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते कन्हैया कुमार यांनी आरमोरी येथील सभेत मतदारांना केले.
जिल्हा गडचिरोली अंतर्गत आरमोरी येथे काल प्रचार सभा संपन्न झाली.आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ कनय्या कुमार यांच्या प्रचारसभा कार्यक्रमात गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते कन्हैया कुमार,जिल्हाध्यक्ष कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून प्रचार सभेला मार्गदर्शन केले.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने सभेला उपस्थित होते.तद्वतच हजारोंच्या संख्येने मतदार बंधू भगिनींनी सभेला उपस्थिती दर्शविली होती.