रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे आणि अशातच चिमुर विधानसभेत राजकीय रंग चढत असताना भारतीय जनता पार्टीत सक्रियतेने कार्य करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे यांनी अखेर भाजपाला रामराम करीत भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत स्वगृही शिवसेना (उबाठा) जात असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता व पक्षात चांगले काम करीत होतो.काही दिवस चांगली वागणूक,मानसन्मान होत होता.
परंतु अचानक या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अपमानास्पद वागणूक मिळणे,विचारात न घेणे असे प्रकार आपल्या सोबत होत असल्याचे लक्षात येताच,भारतीय जनता पार्टीत न राहण्याचा निर्णय ठामपणे घेतला असून तसा राजीनामा पक्षाचे चिमुर तालुकाध्यक्ष राजु झाडे व आमदार बंटी भांगडिया यांचेकडे सुपुर्द केलेला आहे.
भारतीय जनता पार्टीत चहा पेक्षा केटल्या गरम झाल्याने पदाधिकारी यांचे कडुन अपमानास्पद वागणूक,दुजाभाव केला जात होते.म्हणून मी राजीनामा दिला आहे.
यापुढे ते शिवसेना उबाठा मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे चिमुर विधानसभेचे उमेदवार डॉ.सतिश वारजुकर यांना निवडणूक जिंकण्यासाठी काम करतील असे सुतोवाच त्यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
पत्रकार परिषदेला विलास डांगे,सुरेश धानोरकर,अनिल डगवार माजी उपजिल्हा प्रमुख,नरेंद्र कारेकर,कमलाकर बोरकर,संतोष कामडी आदी उपस्थित होते.