आळंदीत श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत बालदिन साजरा..

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक/पुणे..

आळंदी : श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री.ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान,बालगोपालांचे आवडते चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.

      याप्रसंगी श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर,अर्जुन रावडे,मुख्याध्यापक प्रदीप काळे व सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू व माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

      प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे,अमित यांनी थोर नेत्यांचे स्मरण व्हावे त्यांचे कर्तुत्व कळावे म्हणून प्रशालेत विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगत नेहरू विषयी थोडक्यात माहिती आपल्या प्रास्ताविकामधून सांगितली. 

      सचिव अजित वडगावकर यांनी “नेहरूंनी लहान मुलांसाठी कार्य केले” म्हणून त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करतात असे सांगत नेहरूंच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले. 

        बाल मेळाव्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करत बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

       बाल आनंद मेळाव्यामध्ये बालवाडी व इ .१ ली ते ४ थी.च्या सर्व विद्यार्थ्यांनी हात न लावता बिस्कीट खाणे, चेंडू पास करणे,चेंडूचा तोल सांभाळणे, फुगा फोडणे व वाचवणे,उडी मारून बिस्किट खाणे,बॉल आणणे,अळीसारखे चालणे इत्यादी मनोरंजनात्मक खेळ खेळत विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला.

      मेळाव्याचे नियोजन भालेराव प्रतिभा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काळे वर्षा,कांबळे निशा,शेळके वैशाली,चव्हाण राहुल या शिक्षकांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.