महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाला मते देणार काय? — छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सर्व महिला भगिनींचे-बांधवांचे उध्दारक-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अनुचित शब्दाद्वारे केला होता भयंकर अपमान…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

           तात्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रयतेचे महारक्षक व महासंरक्षक छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत माहात्मा ज्योतीबा फुले, राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अश्लील शब्दात बोलून महाभयंकर अपमान केला होता.

     तर महाराष्ट्र राज्याचे उंच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी देशातील सर्व नागरिकांचे,महिला भगिनींचे उध्दारक युगप्रवर्तक-युगपुरुष-बोधिसत्व-विश्वभुषण-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत अपमानास्पद भाषेचा उपयोग करुन सार्वजनिक अपमान केला होता.

        आर.एस.एस.च्या तालमीत वाढलेले आणि भाजपात विविध पदावर काम करणारे महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदावर असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेचे आराध्य दैवत व प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल खालच्या स्तरावरील भाषेचा वापर करुन धडधडीत अपमान केला होता.

          तर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,बहुजनांचे तारणहार माहात्मा ज्योतीबा फुले,भारत देशातील कोटी कोटी महिलांच्या उध्दारक राष्ट्रमाता-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लग्नावर भाष्य करुन याच भाजपाच्या मस्तवाल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शासकीय कार्यक्रमात अश्लील शब्दात बोलून धडधडीत अपमान केला होता.

        याचबरोबर या देशातील तमाम जनतेचे,शेतकऱ्यांचे,विद्यार्थ्यांचे,सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे,बेरोजगारांचे,कामगारांचे,गोरगरिबांचे व दिनदलितांचे उध्दारकर्ते तथा अधिकारान्वये रक्षक असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा व शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्याबद्दल,”शैक्षणिक क्षेत्राला अनुसरून,”भिक्षा मागणारे,असा शब्दप्रयोग उच्च व तंत्रशिक्षण ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता व अपमान केला होता.

                  आर.एस.एस. व भाजपाचे पदाधिकारी,मंत्री,राज्यपाल,हे या देशातील बहुजन महापुरुषांचा वारंवार अपमान करतात आणि जल्लील करतात आणि सोयीनुसार ते बहुजन समाजातील नागरिकांना भरडतात व भरकटत ठेवतात.त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळू देत नाही.

              अपमान करणाऱ्या त्यांच्या जाणिवपूर्वक कृतीचा असला प्रकार बहुजन समाजातील नागरिकांना अप्रगत ठेवण्याचा असतो आणि त्यांचा उध्दार करणाऱ्या महापुरुषांकडे त्यांनीच दुर्लक्ष करावे हा कपटाचा नितिभ्रष्ट कावा असतो.या उद्देशाला बहुजन समाजातील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.

        त्यांच्या उध्दारकर्त्यांकडेच देशातील नागरिकांनी दुर्लक्ष केले की,हळूच योजनांच्या माध्यमातून बहुजन समाजातील नागरिकांच्या डोक्यात ब्राम्हणवाद घुसवीतात व यांनीच तुमच्यासाठी कार्य केले हे बहुजनांच्या डोक्यात बसवितात.

          हा असला प्रकारच बहुजन समाजातील नागरिकांना त्यांच्या मुख्य विचारधारे पर्यंत पोहोचू देत नाही.

            म्हणूनच बहुजन समाजातील नागरिकांनी त्यांच्या उध्दारकर्त्यांचा अपमान करणाऱ्या पक्षाला,”सत्तेपासून,दूर केले पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे…