महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना,हे लक्षात ठेवा…. — भाग ११…..

    लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते…

      तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते..

       राजीव कुमार साहेब ( मुख्य निवडणूक आयुक्त ) घटनात्मक नितीला तुम्ही काळिमा फासलात..

कारण….

       “सार्वजनिक सदसदविवेकबुद्धी विकसित झाल्याशिवाय आणि घटनात्मक नितीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही.

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

      “भारतीय लोकशाही आणि संविधान टिकविण्याची नैतिक जबाबदारी ही प्रमुख तीन संविधानिक संस्थांवरच होती आणि आहे.एक राष्ट्रपती,दुसरे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश,तिसरे म्हणजे तुम्ही मुख्य निवडणूक आयोग.

        “या सर्वामध्ये निवडणुकीच्या काळात ( आचार संहिता लागू झाल्यापासून ते आचारसंहिता उठेपर्यंत ) राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशापेक्षाही सर्वाधिक घटनात्मक अधिकार लोकशाही जपण्यासाठी,तीचे संरक्षण करुन तीला वृद्धिंगत करण्यासाठी संविधानाने तुम्हाला अनुच्छेद क्रमांक 324 ते 329 नुसार सर्वोच्च अधिकार प्रदान केलेले आहेत.

       या काळात सर्व प्रशासकीय अधिकार तुमच्याच ठायी एकवटतात…!

        जर तुम्ही तुमच्या सदसदविवेक बुद्धीशी प्रामाणिक राहिलात ( माजी मुख्य निवडणूक आयुक्त माननीय टी. एन.शेषन साहेबाप्रमाणे ) तरच लोकशाही वृद्धिंगत होईल….

         अन्यथा,लोकशाहीचे रूपांतर ठोकशाहीत झाल्याशिवाय राहणार नाही!

         आज जी मरगळ भारतीय लोकशाहीवर आलेली आहे.सर्वसामान्य जनता जी वैचारिकदृष्ट्या हतबल होऊन सैरभैर झालेली आहे,इकडे चोर,तिकडे शिरजोर कुणाला मत द्यावं,ही जी अवस्था झालेली आहे,त्याला जबाबदार जरी येथील सरकार किंवा व्यवस्था जरी असली,तरी सर्वात मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. 

         कारण या आचारसंहितेच्या काळात जर निवडणूक मतदान प्रक्रिया थांबवण्याचा,स्थगित करण्याचा,प्रलंबित ठेवण्याचा,पारदर्शक पार पाडण्याचा अधिकार,ना राष्ट्रपतीला आहे,ना ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला आहे,प्रधानमंत्री तर खूप लांबची बाब झाली…

        मग अशा काळात सर्वोच्च अधिकार असतांना तुमच्या सदसदविवेक बुद्धीच्या ऐवजी ” कुटनीतीने ” अतिक्रमण केले की,संपूर्ण लोकशाही,संविधान,स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये या देशातून हद्दपार होताना दिसतील नव्हे तुमच्या कुकर्माने दिसत आहेत.

        जेंव्हा पुण्यात 13 दिवसापूर्वी 8 कोटी रुपयांची रोकड असलेली गाडी सापडली.तीचे काय झाले?

          प्रधानमंत्री मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या नावाखाली पेटीएम,फोनपे,यूपीआय ची व्यवस्था आणल्यानंतर कोट्यावधीची रोकड कशी सापडते?

तेही निवडणूकीच्या काळातच…..!

           बरे सापडली, तर ती रोकड कुणाची होती तीचा शोध लागला का?, ती कोट्यावधीची रक्कम व्यापाऱ्यांची असूच शकत नाही.

        कारण केवळ निवडणुकीच्याच काळात व्यापार चालत नसतो ना,तर मग ती कोणत्या राजकीय पक्षाची होती? कोणत्या उमेदवाराची होती? त्या पक्षाची मान्यता,त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द तुम्ही केली का?

         जर तसे तुम्ही केले नसेल,त्याकडे मुद्दाम कानाडोळा केला असेल तर या देशात जे कांही लोकशाहीच्या नावावर चालू आहे.त्याला तुम्ही आणि तुम्हीच एकटे जबाबदार आहात.

      त्याचप्रमाणे माझ्यासारखी असंख्य सर्वसामान्य जनता,सर्वोच्च न्यायालयाचा आणि इतर राज्यातील उच्चं न्यायालयाचा वकीलसंघ, तुम्ही जगातून अनुभव घेऊन बेदखल केलेल्या EVM ला हटविण्याची मागणी करत असतांना,तीच्या धांदलीचे पुरावे देऊन सुद्धा निर्लज्जपणे त्या पुराव्यांना तुम्ही केराची टोपली दाखवली.

       परंतू,एकवेळ सुद्धा तुमच्या सदसदविवेक बुद्धीला तुम्ही प्रश्न विचारला नाही की,या EVM ला हटवून एक तरी निवडणूक पारदर्शक करुन दाखवू ,परंतू तुम्ही तुमचा विवेकच जर गहाण ठेवला असेल ( RSS कडे )…..

      तर तुम्ही घटनात्मक नितीला काळिमा फासला आहात!

       असाच जर लोकशाहीचा प्रवास चालणारा असेल,तर तो आम्ही ( सर्वसामान्य भारतीय जनता ) कधीही खपवून घेणार नाही…

       कारण लोकशाहीत जनतेसाठी व्यवस्था आहे,व्यवस्थेसाठी जनता नाही.आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा..

जनता की अदालत..

       सर्वात महान आहे,ती कुणाकडेही गहाण नसून ती संविधाननिष्ठ आणि लोकशाहीमूल्यांची पुरस्कर्ती आहे.

        येणारा 26 नोव्हेंबर संविधान दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी त्या दिवसाला 75 वर्षे पूर्ण होताहेत.

      त्या दिवसापासून आम्ही ( सर्वसामान्य भारतीय जनता ) स्वातंत्र्याकडून पुन्हा गुलामीकडे जाणाऱ्या देशाला स्वातंत्र्याकडून लोकशाही मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठीचे पहिले पाऊल टाकण्यास सुरुवात करणार आहोत..

    त्यासाठी जगातील कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकणार नाही.

संविधान जागृती देशाची प्रगती

हे ब्रीद घेऊनच…..

      परंतू,सध्या तरी संविधान विरोधी शक्तीला सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठीच मतदान करा.कारण सत्ताधारी कसे संविधान विरोधी होते,याचा अनुभव आपण महाराष्ट्रात घेतलेला आहे. म्हणून…

कारण…….

तुमच्याच हातात सर्वकाही आहे…

      कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे,की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल..

      जर कदाचित कडेलोट झालाच तरी आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून टाकून आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेऊ…

       कारण हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगिकृत करण्यासाठी आहे.

असा निर्धार करुनच मतदान करा….

*****

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात…..

******

आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक…

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…