दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली.या योजनेंतर्गत आतापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जमा करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १५ वा हप्ता उद्या ३ वाजून १५ मिनिटांनी जारी करतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ वा हप्ता जारी करताच देशातील जवळपास ८ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये जमा होतील.
केंद्रीय कृषी आणि कल्याण विभाग द्वारा सोशल मीडिया वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून १५ व्या हप्त्याची माहिती देण्यात आली आहे.