
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चंद्रपूर :-
प्रमोद साळवे हे व्यवसायाने आश्रमशाळा शिक्षक असून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवितात तर त्यांची पत्नी सौ.माधुरी साळवे ह्या राजुरा येथे जेनेरिक मेडिकल चालवतात.साळवे दाम्पत्य सतत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबानी या वर्षाची दिवाळी कमलापुर,नैनगुडम येथील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली.दिवाळीचा फराळ,फळे आणि फटाके विद्यार्थ्यांना देत त्यांच्या कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करुन सामाजिक दायित्व पार पाडले.
कुणाच्यातरी चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य हे पैश्यात मोजता येत नाही.मागील वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर येथे जागतिक मृदा दिनानिमित्त सहभाग दर्शविला.
तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जेनेरिक मेडिकल franchise देवून बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला..