प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- देशातील सामाजिक राजकिय वातावरण गढूळ होत चालले आहे. द्वेषभावना वाढीस लागली आहे. देशात लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे. अशा स्थितीत एकमेकांविषयी प्रेम, सदभावना वाढीस लागावी यासाठी कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली या यात्रेत पक्षभेद व मतभेद बाजूला सारून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले आहे.
आरमोरी तालुका काँग्रेसतर्फे आरमोरी येथील स्थानिक साई दामोदर मंगल कार्यालयाच्या सभागृहात काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रा संदर्भात नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा गडचिरोली काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डाँ.नितीन कोडवते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातुकुलकर, वामनराव सावसाकडे, जि. प.चे माजी सभापती आनंदराव आकरे, अनुसूचित जाती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वृंदाताई गजभिये, माजी जि.प.सदस्या मनीषाताई डोनाडकर, माजी जि. प.सदस्य केशव पाटील गेडाम, रजनीकांत मोटघरे, जि. प.चे माजी सभापती विश्वास भोवते, आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम, जिल्हा उपाध्यक्ष नंदू नरोटे, रामभाऊ हस्तक, नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, आरमोरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगला कोवे, माजी प स.सदस्या किरण मस्के, नगरसेविका उषा बरसागडे, निर्मला किरमे, दुर्गा लोणारे, कीर्ती पत्रे,भीमराव बारसागडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना गेडाम म्हणाले की, दि.१७ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातील पातूर येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा निघणार असून या यात्रेत आरमोरी तालुक्यातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले की, आज जरी काँग्रेसची देशात सत्ता नसली तरी काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे.सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन सदैव जनहिताचे काम करणारा प्रथम, कायम ,लोकप्रिय असणारा हा पक्ष आहे .या पक्षाने आतापर्यंत देशांमध्ये अनेक बदल घडवून इतिहास रचला आहे.
प्रमुख अतिथी डाँ.किरसान म्हणाले की, देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. या पक्षाने देशाला ऐक्याच्या धाग्याने बांधण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी गटागटातील राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकसंघ होऊन पक्षाची बांधणी बळकट करावी.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून काँग्रेसचे नवनियुकत तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे तसेच जांभळी ग्रा.प.च्या नवनियुक सरपंचा अनंती पदा यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्याला तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नंदू नरोटे,प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे तर आभार भुपेश कोलते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड.विजय चाटे, विजय सुपारे, निलेश अंबादे, रुपेश जवंजाळकर, स्वप्नील तडम, सुरज भोयर, सुरज सोमणकर अंकुश गाढवे, हिवराज बोरकर, साबीर शेख, नरेश टेम्भुरने, नीलकंठ गोहणे, यज्ञकला ठवरे, भुपेश वाकडे, छोटुसिंग चंदेल, मनोज टेम्भुरने, कडाम,विनोद कुंभारे, भोलानाथ धानोरकर, तसेच काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.