नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली: भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही राईस मिलर्स ने हंगाम २०२०-२१ मध्ये भरडाई न करता बाजारपेठेतुन पीडीएस तांदूळ खरेदी करून शासनास जमा केला व भरडाई करिता मिळालेला धान सरळ खरेदी केंद्रावरुन बाजारपेठेत विक्री केला.भरडाई न करता शासनाकडून अपग्रेडेशन चार्जेस,मीलींग चार्जेस व वाहतूक भाडे यांची कोट्यवधी रुपयांची अधिकार्यांसोबत संगनमत करून वसुल केला.
भरडाई करिता एक क्विंटल धानाला दिड (१.५) युनिट वीज लागतो.४०० क्विंटल धान भरडाई करण्याकरिता कमीत कमी ६०० युनिट लागतात.मिलर्सने तांदूळ जमा करण्याची तारीख व शेवट तांदूळ जमा केल्याची तारीख कालावधीचा विद्युत देयक तपासल्यास प्रत्यक्ष भरडाई किती झाली हे कळुन झालेला भ्रष्टाचार उघडकीस येईल.यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा पनन अधिकारी यांनी करोडो रुपयांची संपत्ती उभी केलेली आहे.
या प्रकरणाची चौकशी केली असता महाराष्ट्रात झालेला करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल.त्याचप्रमाने हंगाम २०२१-२२ मध्ये सुद्धा दिल्लीच्या केंद्रीय तपासने धाड टाकून मिलर्सच्या गोदामातून तांदूळ जप्ती केला होता.त्यानंतर सुद्धा त्या मिलर्सुने अधिकार्यांसोबत संगनमत करून जुने प्रकरण दाबून धान भरडाई न करता पीडीएस तांदूळ जमा केले.
भरडाईचा कालावधी ६ ते ८ महिन्याचा असतो. ४ टन क्षमतेचा मील जास्तीत जास्त ११५ ते १४० लाट पर्यंत काम करु शकतो.जर एका मिलची याव्यतिरिक्त जास्त भरडाई झाली असेल तर भ्रष्टाचार किती खोलवर रुजलेला आहे हे लक्षात येईल.
भरडाई न करता शासनाकडून चार्जेस व भरडाई रक्कम घेनार्या मिलर्सवर व त्यासंबंधीत अधिकार्यांवर चौकशी करून झालेल्या करण्यात यावी.असे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, तालुकाध्यक्ष निलय झोडे, शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले,शहर उपाध्यक्ष रवी भोंगाने उपस्थित होते.