प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आदिवासी बहु उद्देशिय विकास समिती, वैरागड यांच्या वतीने दि. १४ नोव्हे. ते दि. १५ नोव्हे. रोजी येथील आदिवासी गोटुल येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती सोहळा पार पडणार आहे. 

दि. १४ नोव्हे. रोजी संध्याकाळी ०७:३० वाजता आदिवासी गोंडी धर्मीय देवी-देवतांचे पूजा विधी कार्यक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम यांच्या हस्ते पार पडणार आहे. दि. १५ नोव्हे. रोजी दुपारी १२ वाजता क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहण आणि कार्यक्रमाचे विधिवत उद्दघाटन आणि समाज प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. 

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम आणि उपाध्यक्ष सरपंचा संगीता पेंदाम उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्दघाटन आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ. चिकराम आणि सहउद्दघाटक गडचिरोली जिल्हा रुग्णालय डॉ. मसराम यांचे हस्ते पार पडणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी किसनराव खोब्रागडे महाविद्यालय संस्थापक भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य संपत आळे, वैरागड वैद्यकीय अधिकारी डॉ. धुमाळे, माजी जि. प. सदस्य केशव गेडाम, माजी जि. प. सदस्य पुनम गुरणुले, माजी समाज कल्याण अधिकारी विश्वास भोवते, आरमोरी माजी पं. स. उपसभापती विनोद बावनकर, उपसरपंच भास्कर बोडणे, मंडळ अधिकारी कुमरे, ग्राम विकास अधिकारी बोदेले, तलाठी रासेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

कार्यक्रमात सेवा निवृत्त शिक्षक कन्नाके, सेवा निवृत्त शिक्षक सिडाम, सेवा निवृत्त शिक्षक मडावी आदींचे सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमास जास्तीत-जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आदिवासी बहु उद्देशिय विकास समिती अध्यक्ष कैलास कोडाप, उपाध्यक्ष मोहन टेकाम, सचिव निखिल गेडाम, सहसचिव दिनेश कन्नाके, कोषाध्यक्ष हरी मडावी आणि राणी दुर्गावती महिला उत्सव समिती अध्यक्ष सुरेखा ज. पेंद्राम, सचिव नलु ला. अत्राम तसेच समस्त आदिवासी समाज, वैरागड यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com