महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ अंतर्गत कामगारांना संसार रुपी भांडी व कामगार किटचे वाटप…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

            पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे रविवार दिनांक 13 रोजी राज्य शासनाच्या वतीने कामगार विभागामार्फत इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ अंतर्गत संसार रूपी भांडी व कामगार किट चे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले.

           उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनेत्रा वैणी पवार,विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे, संचालक श्रीकांत बोडके यांच्या प्रयत्नाने मिळालेली संसार रुपी भांडी व कामगार किटचे वाटप बांधकाम कामगार व मजुरांना सर्व साहित्याची पेटी किट चे वाटप करण्यात आले.

               साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच ज्योतीताई बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच सुदर्शन बोकडे,उपसरपंच संतोष सुतार, माजी उप सरपंच पांडूरंग बोडके, बबन दादा बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके,नामदेव बोडके या सर्वांच्याच हस्ते आलेल्या सर्व मजूर व कामगारांना भांडी व कामगार किटचे वाटप करण्यात आले.

            भांडी किट वाटप प्रसंगी संचालक श्रीकांत बोडके बोलत असताना म्हणाले की मी माझ्या गावाला शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व तो प्रयत्न करीतच राहील.

           उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्ता मामा भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सर्व काही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील येणाऱ्या विधानसभेसाठी पिंपरी बुद्रुक मधून दत्तात्रय मामा भरणे यांना 75 टक्के मतदान घडवून आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.

             आम्ही कार्यकर्ते सर्वच त्याच कामाला लागलो आहोत. दत्ता मामांनी आम्हाला पिंपरी बुद्रुक गावासाठी कोट्यावधी रुपये विकास निधी दिलेला आहे.पानंद रस्ते, अंतर्गत गटार,अंतर्गत रस्ते, काँक्रीट रस्ते, शौचालय, सभामंडप, पाणीपुरवठा योजना, अशा अनेक प्रकारची कामे केल्यामुळे भरणे मामांचा विसर कधीही पडणार नाही. संचालक श्रीकांत बोडके यांचे कामगार किट वाटप प्रसंगी उदगार. 

              निमगाव केतकी तालुका इंदापूर या भागातील उद्योजक व ऑनलाइन सर्विसेस सोमनाथ कुचेकर यांच्या कृष्णा ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या मार्फत गेली अनेक दिवसापासून या भागातील 800 हून अधिक भांडी किट व कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार किटचे वाटप करण्यात आले.

              यामध्ये वाटप करीत असताना कोणत्याही कामगार व मजुराची तक्रार आलेली नाही. स्वच्छ कारभार, व्यवहार चोक, असल्यामुळे निमगाव येथील सोमनाथ कुचेकर यांच्यावर हजारो लोकांचा विश्वास संपादन झालेला आहे.असे कामगारांच्या व मजुरांच्या कडून सांगण्यात येत आहे इंदापूर तालुक्यातील बांधकाम कामगार व मजुरांची निमगाव येथील सोमनाथ कुचेकर यांच्याकडे पिंपरी बुद्रुक मध्ये धाव घेऊन आपा आपले किट घेऊन जाऊ लागली.पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सोमनाथ कुचेकर यांचे आभार व्यक्त केले. 

               या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके, बबन बोडके, माजी सरपंच ज्योती ताई बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी सरपंच पांडुरंग बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, नामदेव बोडके, सोमनाथ बोडके, नबीलाल शेख, अनिल गायकवाड, केशव बोडके, प्रवीण बोडके, महेश बोडके, जगू मामा मोहिते ,तय्यब शेख ,मोहन नरूटे, भाऊ सूर्यवंशी, चंद्रकांत बोडके, जब्बार शेख, नितीन रणदिवे, सोमनाथ रजपूत, हरिदास सूर्यवंशी, बादल पाटील, आदी मान्यवर व ग्रामस्थ कामगार मजूर महिला भगिनी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.